कोरोना वॉरमधलं स्मार्ट वॉच

कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील आघाडीचे योद्धे म्हणजे डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी त्यांना वारंवार रुग्णांच्या जवळ जावे लागते. त्यामुळे त्यांना या विषाणूची लागण होण्याचा धोकाही असतो. अशा लोकांसाठी आता एक स्मार्ट वॉच विकसित करण्यात आले आहे. त्याच्या सहाय्याने रुग्णाच्या जवळ न जाताही त्याची माहिती मिळू शकेल. आयआयटी हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी हे उपकरण विकसित केले आहे. एखाद्या घड्याळासारखे ते मनगटावर बांधून त्याचा वापर करता येऊ शकतो.

हे उपकरण रुग्णाच्या मनगटावर बांधल्यानंतर रुग्णाची संपूर्ण माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे रुग्णापासून दूर राहूनही त्याच्यावर डॉक्टरांना लक्ष ठेवता येईल. ‘नेमोकेअर रक्षा प्लस’ असे या उपकरणाचे नाव आहे. त्याच्या सहाय्याने रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी, हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट आणि तापमान यांची माहिती मिळेल. कोरोना रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणे हे महत्त्वाचे असते. अशा रुग्णांचा श्वास कोंडू शकतो व वेळेत ऑक्सिजन मिळाले नाही तर त्यांचा मृत्यूही ओढवू शकतो. या उपकरणाच्या सहाय्याने रुग्णांच्या ऑक्सिजनची पातळी वेळोवेळी डॉक्टरांना या उपकरणाशी कनेक्टेड उपकरणाद्वारे मिळू शकेल. शिवाय रुग्णाला किती वेळ खोकला आला आणि रुग्ण कुठे कुठे गेला याची माहितीही हे उपकरण देऊ शकते.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा