नंदनवन मित्र मंडळाने सामाजिक दायित्व जपले आहे – उपनेते अनिल राठोड

अहमदनगर- गणेशोत्सव हा सर्वांना एकत्र आणणारा उत्सव असल्याने परिवाराबरोबरच सार्वजनिक मंडळातील कार्यकर्ते ही एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात ही आनंददायी बाब आहे. श्री गणेश विघ्नहर्ता असल्याने आपल्यावर आलेले संकटे दूर करतो. गणेशोत्सवात धार्मिकतेबरोबरच सामाजिक कार्यासही प्राधान्य दिले पाहिजे. नंदनवन मंडळ नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. मंडळाने नेहमीच सामाजिक दायित्व जपले आहे. अशा मंडळाचा आदर्श इतर मंडळांनीही घ्यावा, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

नंदनवन मित्र मंडळाच्या गणपतीची आरती शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक संजय जाधव, अध्यक्ष सुरज जाधव, मगनभाई पटेल, पुरुषोत्तम पटेल, नरसिंह पटेल, नगरसेवक योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, शरद कोके, दिपक भोसले, दत्ता जाधव आदि उपस्थित होते.

याप्रसंगी संजय जाधव म्हणाले, नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने गणेशोत्सवबरोबर इतरही अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदाच्या वर्षी देखावा सादर न करता हा निधी पुरग्रस्तांना देण्यात आला आहे. तसेच वर्षभरात अन्नदान, वृक्षारोपण, गुणवंतांचा सत्कार, त्याबरोबच विविध महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येत असतात. त्याबरोबर वंचित घटकांना मंडळाच्यावतीने मदतही करण्यात येते.

मंडळाचे अध्यक्ष सुरज जाधव यांनी मंडळाच्या कार्याची माहिती देऊन उपस्थित पाहुण्यांचा सत्कार वृक्षभेट देऊन केला. सूत्रसंचालन सोमनाथ नजान यांनी केले तर आभार ऋषीकेश जाधव यांनी मानले.

यावेळी मंडळाचे विशाल जाधव, महेंद्र वारुळे, रविंद्र जाधव, हर्षल भणभणे, विशाल लोळगे, अभि पडोळे, सनी झेंडे, गणेश औशिकर, राज जाधव, अवधुत जाधव, ओंकार शिंदे, विशाल गायकवाड, मंगेश लांडे, आशिष जाधव, शंभू जाधव, स्वप्नील घटी, अभिषेक गोंधळे, अंकुर कोळेकर, अक्षय गोंधळे, ओंकार शेळके, सोनू राठोड, यश जाधव, श्रीकांत सरोदे, गणेश जाधव, गणेश वाघमारे आदि उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा