नालंदा विद्यालयास सीबीएसई बोर्डाची मान्यता

अहमदनगर- नगर-सोलापूर रोडवरील वाळुंज येथील नालंदा विद्यालयास नुकतीच सीबीएसई बोर्डाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता या विद्यालयात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सीबीएसईप्रमाणे शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही मान्यता प्राप्त करण्यासाठी शाळेला त्या सर्व सहकारी मान्यता प्राप्त कराव्या लागतात. ज्या राज्य शासनाद्वारे दिल्या जातात.

स्वच्छता आणि सुरक्षिततेची व्यवस्था, सुसज्ज इमारत, शिक्षणाचा उच्च स्तर, शालेय कला, क्रीडा विभाग, अवगमनाची साधने हे सर्व गोष्टी पाहून केंद्र शासन विद्यालयास मान्यता देत असते. नालंदा स्कूलने यासर्व बाबी पूर्ण केल्या असल्याने ते ही मान्यता मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत.

त्यासाठी सीबीएसईने कमिटी नेमली होती. या कमिटीने शालेय नियमानुसार तपासणी केली. या कमिटीत 2 सभासद होते. 1 केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक व दुसरे सीबीएसईच्या खासगी विद्यालयाचे मुख्याध्यापक. या दोन्ही सभासदांनी नालंदा विद्यालयाचे बारकाईने परीक्षण करून तपासणी केली व पुढील कारवाईस अहवाल सुपूर्द केला. त्यानंतर आवश्यक ती सर्व कारवाई होऊन नालंदा विद्यालयास इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची मान्यता देण्यात आली आहे.

संस्थेचे संचालक कर्नल बहादुर्गे यांनी हे यश केवळ कोणा एका व्यक्तीचे नसून सर्वांच्या सहकार्याने प्राप्त झाले आहे. यावेळी त्यांनी मंत्रालय शिक्षण विभाग, महानगरपालिका, वाळुंज ग्रामपंचायत यांचे मनःपूर्वक आभार मानले.

नालंदा स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी नेहमी शिक्षकवृंद प्रयत्नशील असतात. वर्षभरात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. आरोग्याच्या दृष्टीने नियमित योगासनेचे धडे दिले जातात. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हे, तर राज्यातही आपले नाव चमकवले आहे. हीच यशाची पावती आमच्या विद्यालयाची असल्याचे विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी बहादुर्गे यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा