नगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे काम न करण्याचा आरपीआय आठवले गटाचा निर्णय

नगर जिल्ह्यात घेणार विरोधी भूमिका – अजय साळवे यांची माहिती 

अहमदनगर- आरपीआयची भाजपसोबत युती असून महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेना पक्ष निवडणुकीत आरपीआयच्या मतांचा वापर करून घेत आहे. परंतु आरपीआय (आठवले गट) ला जागा देण्याचा प्रश्न आल्यास शिवसेना भाजपकडे बोट दाखवते. याचा निषेध म्हणून नगर जिल्ह्यातील आरपीआयचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणार असून संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचे काम करणार नाही, असे आरपीआयचे महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी जाहीर केले आहे.

यासंदर्भात साळवे यांनी म्हटले आहे की, महायुतीतील शिवसेना पक्षाने आरपीआय आठवले गटाचे उमेदवारांना जागा न सोडल्याने आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत. भाजप शिवसेना रिपाई महायुतीमध्ये रिपब्लिकन मताचा फायदा घेत भाजप व शिवसेना केंद्रात व राज्यात सत्तेवर आली. रिपाईच्या युतीमुळे शिवसेना आणि भाजप भरघोस यश मिळाले परंतु विधानसभा निवडणुकीत रिपाईला सत्तेत वाटा देताना शिवसेना पक्षाने रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागेवर उमेदवारांना उमेदवारी नाकारली म्हणून आरपीआयचे कार्यकर्ते नाराज आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीचे स्वप्न पूर्ण केले परंतु सध्याच्या शिवसेना नेतृत्वाने त्या स्वप्नांना काळिमा फासण्याचे काम केले आहे. म्हणून नगर जिल्ह्यातील आरपीआयचे कार्यकर्ते शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणार आहेत कारण विधानसभा निवडणुकीत चेंबूरमधून दीपक निकाळजे, पिंपरीमधून चंद्रकांत सोनकांबळे, मानखुर्द शिवाजीनगरमधून गौतम सोनवणे, अंबरनाथ धारावी चांदिवली व अहमदनगरमधील श्रीरामपूर मतदारसंघातून राजाभाऊ कापसे यापैकी कोणताही मतदारसंघ शिवसेनेने आरपीआयला सोडलेला नाही त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते विविध आंबेडकरी चळवळीतील संघटना व रिपब्लिकन पक्षाचे विविध गटाची एकत्र बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे सचिव अजय साळवे यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा