नगर अर्बन बँकेच्या प्रगतीत कर्मचार्‍यांचे बहुमोल योगदान – प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा

अहमदनगर- नगर अर्बन बँकेची सूत्रे 1 ऑगस्टपासून हाती घेतल्यानंतर बँकेची पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. नगर अर्बन बँक मजबूत स्थितीत आहे. बँकेची चांगली प्रगती झाली आहे. बँकेच्या या प्रगतीत कर्मचार्‍यांचे योगदान बहुमोल आहे. अर्बन बँक प्रमाणेच अर्बन बँक स्टाफ क्रेडिट सोसायटीही चांगली प्रगती करत आहे. सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना चांगली सेवा मिळत असल्याने क्रेडिट सोसायटीच्या कार्याचे अभिनंदन, असे प्रतिपादन नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केले.

नगर अर्बन बँक स्टाफ क्रेडिट सोसायटीची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषय एकमताने मंजूर होत संपन्न झाली. बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी या सभेत उपस्थित कर्मचारी सभासदांना मार्गदर्शन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीनचंद गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस क्रेडिट सोसायटीचे चेअरमन वसंत कुसमुडे, व्हाईस चेअरमन हरिभाऊ हिरणवळे, प्रमुख व्यवस्थापक सतीश शिंगटे, सतीश रोकडे, एम. पी. साळवे, डी. के. साळवे, सुनिल काळे, मनोज फिरोदिया, राजेंद्र डोळे आदि वरिष्ठ अधिकार्‍यांसह क्रेडिट सोसायटीचे संचालक बाबासाहेब मगर, प्रसाद ठोसर, भारती मुत्याल, सविता देसर्डा, अप्पासाहेब थोपटे, सचिव अतुल भंडारी, सहसचिव स्वप्नील भणगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना चेअरमन वसंत कुसमुडे म्हणाले, नगर अर्बन बँक स्टाफ क्रेडिट सोसायटीच्या प्रगतीत संचालक मंडळ, कर्मचारी व सभासदांचा मोठा सहभाग आहे. सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना सवलतीच्या दरात आर्थिक पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. कर्मचार्‍यांनीही भरपूर सहकार्य केल्यामुळे सोसायटीच्या ठेवींमध्ये वाढ झाली आहे.

प्रमुख व्यवस्थापक एम. पी. साळवे यांचेही यावेळी भाषण झाले. क्रेडिट सोसायटीचे सचिव अतुल भंडारी यांनी अहवाल वाचन केले. व्हाईस चेअरमन हरिभाऊ हिरणवाळे यांनी आभार मानले. बाळासाहेब ओतारी यांनी सूत्रसंचालन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा