मोहरमच्या मिरवणुकीतून सामाजिक एकतेचे दर्शन

अहमदनगर- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे मोहरम निमित्त काढण्यात आलेल्या ताजिया विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम भाविकांनी सहभागी होऊन धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडविले. गावातून पारंपारिक वाद्यांसह निघालेल्या या ताजिया मिरवणुकिचे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले.

मंगळवारी (दि.10 सप्टेंबर) सकाळी निघालेली ही मिरवणूक संध्याकाळी शांततेत पार पडली. गावात ठिकठिकाणी ताजियाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच या हसन-हुसेनच्या निनादात भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले.

यावेळी डोंगरे संस्थेचे पै.नाना डोंगरे, बशीरभाई शेख, पै.वलीभाई शेख, दिलीप शेख, नवाब शेख, अन्सार शेख, गुलाब शेख, नुरमोहंमद शेख, महेबुब शेख, सादिक शेख, मन्सूर शेख, इरफान शेख, साहिल शेख, आसिफ शेख, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, आरिफ शेख, समीर शेख, ताराभाभी शेख, नगीना शेख, छन्नू शेख, जुबेदा शेख, रुकसाना शेख, भास्कर चारुडे, आबिदा शेख, उस्मान शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा