देवीच्या यात्रेतून मोबाईलची चोरी

नेवासा- देवीच्या पालखीचे दर्शन घेताना झालेल्या गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरांनी 20 हजार रुपये किंमतीचा ओपो एफ कंपनीचा मोबाईल अज्ञात चोराने चोरून नेला. ही घटना वरखेड येथे बुधवारी (दि.24) साडे अकरा वाजता घडली. आदर्श प्रकाश तुपे (रा. फाजलपूर, औरंगाबाद) हे वरखेड यात्रेत देवदर्शनाकरिता आले असता देवीची पालखी येण्याच्या वेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरांनी त्यांच्या खिशातून मोबाईल चोरून नेला. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पो. ना. काळे हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा