मँगो चॉकलेट

साहित्य – आंबा रस ताजा चार कप, दूध पावडर दोन कप, साखर तीन कप, ग्लुकोज पूड एक कप, पाव कप शुध्द तूप.

कृती – आंब्याच्या रसात साखर घालून ती पूर्ण विरघळून घ्या. नंतर दूध पावडर व ग्लुकोज पूड एकत्र करुन चांगली मिसळून आंबा मिश्रणात टाकून भांडे मंदाग्नीवर ठेवा. ढवळत राहा.

मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत थांबा. थाळीला तुपाचा हलकासा हात लावून हे घट्ट झालेले आंबा मिश्रण त्यात ओता. पसरुन थापा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. आंबा चॉकलेट तयार.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा