लोकन्यायालयाद्वारे समाजात आनंदाचे व बंधुभावाचे वातावरण निर्माण होते – श्रीकांत आणेकर

अहमदनगर- लोकन्यायालयात पक्षकार, न्यायाधीश, वकील व कर्मचारी यांनी एकत्रित प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटतील यासाठी जेवढा प्रयत्न करायला हवा तो आपण सर्व मिळून करू. लोकन्यायालयाद्वारे जास्तीत जास्त खटले मिटुन आपापसातील वाद मिटवून संबंध सुदृढ व्हावेत हीच लोकन्यायालयाद्वारे अपेक्षा असते. समाजात आनंदाचे व बंधुभावाचे वातावरण लोकन्यायालयामुळे निर्माण होते, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले.

जिल्हा न्यायालयात जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व वकील संघटनांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. विधीसेवा प्राधिकरणाच्या जनजागृतीच्या ‘नालसा’ गीताने या लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले.

यावेळी जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप, अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सुनिलजीत पाटील, सरकारी वकील सतीश पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. शेखर दरंदले, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे, अधिक्षक रमेश नगरकर आदींसह सर्व न्यायिक अधिकारी, वकील व पक्षकार उपस्थित होते.

लोकअदालत संदर्भात विविध समित्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या समित्यामधील न्यायिक अधिकार्‍यांचे लोकन्यायालय यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीने मिटलेल्या प्रकरणांत एकूण वसुल रक्कम बावीस कोटी चोवीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे चौर्‍याहत्तर रुपये एवढी झालेली आहे. या लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्हयामधील खटलापूर्व व दाखल प्रकरणे असे मिळून एकूण 2847 इतकी प्रकरणे निकाली निघाली.

न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे म्हणाले, लोकन्यायालयाद्वारे जास्तीत जास्त प्रकरणे मिटली जात आहेत. त्यामुळे न्यायालयावरील ताणतणाव कमी होत आहे, असे सांगून जास्तीत जास्त प्रकरणे मिटवण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव सुनीलजीत पाटील म्हणाले, पक्षकारायचा वेळ पैसा वाचून मोठी प्रलंबित खटले लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी लोकअदालत ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून काम करताना खटलापूर्व व प्रलंबित जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी प्राधान्य देत आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करत आहेत.

सूत्रसंचालन जिल्हा न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी केले. आभार अॅड.भक्ती शिरसाठ यांनी मानले. या लोकन्यायालयास वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. गजेंद्र पिसाळ, विशेष सरकारी वकील सुरेश लगड, अॅड. प्रसन्ना जोशी आदींसह वकील व पक्षकार सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, विधिज्ञ, बँक अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, विजवितरण कंपनी अधिकारी, विधि स्वयंसेवक, प्रबंधक, जिल्हा न्यायालय व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा