‘कोरोना’च्या संकटकाळात शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे विज बिल माफ करावे, ग्रामस्थांची मागणी

कृषीमंत्री व ऊर्जा राज्यमंत्री यांना निवेदन

अहमदनगर – ‘कोरोना’ महामारीच्या संकटात शेतकरी देखील आर्थिक विवंचनेत असताना महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे विज बिल माफ करण्याच्या मागणीचे निवेदन निंबळक गटातील ग्रामस्थांनी कृषीमंत्री दादासाहेब भुसे व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिले. यावेळी निंबळकचे माजी संरपच विलास लामखडे, समीर पटेल, भाऊराव गायकवाड, पोपटराव गाडगे, अशोक कळसे, खारेकर्जुने येथील दत्तात्रय शेळके पाटील, विकास निमसे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

‘कोरोना’चा फटका मोठ-मोठ्या उद्योगधंद्यासह सर्वसामान्य व्यापारी, व्यावसायिक व कामगारांना बसला आहे. तर यापासून शेतकरी देखील वाचलेले नाही. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुर्ण अर्थचक्र बिघडले आहे. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव नसल्याने शेतकरी कोरोनासह विविध नैसर्गिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे विज बिल माफ करण्याची मागणी निंबळक गटातील ग्रामस्थांनी केली आहे. कृषी विभागाच्या एका कार्यक्रमानिमित्त कृषीमंत्री भुसे व ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे आले असता त्यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा