पर्याय शुल्कमुक्त क्रेडीट कार्डचा

आजच्या काळात क्रेडिट कार्डला मागणी वाढत चालली आहे. क्रेडिटचा वापर सुलभ असल्याने आणि बिल भरण्याचा कालावधीही सुमारे दीड महिना मिळत असल्याने ग्राहकांचा कल याकडे वाढत चालला आहे. बिल भरण्याचा काळ साधारणपणे 50 दिवसाचा असतो आणि तोही व्याजमुक्त. म्हणूनच बँकांनी देखील क्रेडिट कार्डची वाढती लोकप्रियता पाहून वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड बाजारात आणले आहेत. जर आपण क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर शुल्क मुक्त क्रेडिट कार्डची निवड करण्यास प्राधान्य द्या. अनेक बँका कार्डवर वार्षिक शुल्क आकारत नाहीत. मात्र काही कार्डवर 400 रुपयांपासून वार्षिक शुल्क आकारले जातात.

वेळेवर बिल न भरल्यास जबर व्याज

क्रेडिट कार्ड हे एकप्रकारचे कर्ज असते आणि ते एकप्रकारे असुरक्षित कर्ज (असिक्योर्ड लोन) या श्रेणीत येते. कार्डवर खर्च केल्यास त्याचा भरणा करण्यासाठी ग्राहकाला 45 ते 50 दिवसाचा व्याजमुक्त कालावधी मिळतो. व्याजमुक्तचा कालावधी हा बिल आकारल्याच्या तारखेपासून गृहित धरला जातो. त्याचवेळी बिल वेळेवर न भरल्यास 36 टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. त्यामुळे बिलाचा भरणा नियमित आणि वेळेच्या आत करणे फायद्याचे आहे.

शुल्क मुक्त कार्डास प्राधान्य

बँक आता दोन प्रकारच्या कार्डाचे सादरीकरण करत आहेत. पहिल्या कार्डमध्ये वार्षिक शुल्क आकारले जाते. तर दुसरे कार्ड मोफत असते. त्यात कोणत्याही प्रकारचे वार्षिक शुल्क आकारले जात नाही. शुल्क मुक्त क्रेडिट कार्डमध्ये प्रारंभीच्या काळात खर्चाची मर्यादा कमी असते. एकंदरित प्रथमच क्रेडिट कार्ड घेणार्‍यांसाठी शुल्कमुक्त कार्ड फायद्याचे ठरू शकते.

क्रेडिट स्कोर वाढण्यासाठी फायदेशीर

दोन प्रकारच्या कार्डमध्ये शुल्काबरोबरच सुविधांचे देखील अंतर असते. शुल्क मुक्त क्रेडिट कार्डमध्ये रिवॉर्ड पॉइंट असतात. विशेष म्हणजे रिवॉर्ड पॉइंटची रक्कम ही खर्च झालेल्या रक्मेतून कपात केली जाते. त्यामुळे अशा बिलाचा भरणा वेळेवर किंवा वेळेच्या अगोदरच केला जातो. म्हणून शुल्क मुक्त क्रेडिट कार्डने खर्च करण्यावर क्रेडिट स्कोर चांगला वाढू शकतो.

सुविधांचे आमिष महागडे

शुल्कमुक्त क्रेडिट कार्डचा व्याजमुक्त कालावधी हा 45 ते 50 दिवसांचा असतो. त्याचबरोबर कॅशबॅक ऑफर, इंधन भरल्यास रिवॉर्ड पॉइंटस यासारख्या सवलती, ऑफर सादर केल्या जातात. त्याचबरोबर परदेशातील प्रवास, महागड्या क्लबचे सदस्यत्व आदींवर मिळणार्‍या सवलतीचे आमिषही महागात पडू शकते. त्यामुळे अशाप्रकारचे कार्ड घेणे हे फायद्याचे नाही. म्हणूनच पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेणार्‍या मंडळींनी शुल्क मुक्त कार्ड घेण्यास प्राधान्य द्यायला हवे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा