प्रत्येक गृहिणीत सुग्रण दडलेली असते – माजी नगरसेविका विणा बोज्जा

किडस् सेकंड होमच्या पालकांमध्ये अनोखी मोदक बनवा स्पर्धेस प्रतिसाद

अहमदनगर- प्रत्येक सण-उत्सवाला स्वादिष्ट अन्नपदार्थांची जोड आपल्या पुर्वजांनी विचारपूर्वक दिली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात सण-उत्सवात विविध पदार्थ गृहिणी तयार करत असतात. प्रत्येक गृहिणीत सुग्रण दडलेली असतेच. फक्त तिला योग्य संधी व व्यासपीठ मिळण्याची गरज असते. याच उद्देशाने किडस् सेकंड होम स्कूलने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मोदक बनवा स्पर्धेचे आयोजन करुन गृहिणींना चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेविका विणा बोज्जा यांनी केले.

विश्‍वनिर्मल फौंडेशन संचलित बोल्हेगांव येथील किडस् सेकंड होम स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मोदक बनवा या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या गृहिणींना विणा बोज्जा यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत 20 पालकांनी भाग घेतला होता.

यावेळी संवाद प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा रुपाली मॅथ्यू, विश्‍वनिर्मल फौंडेशनच्या उपाध्यक्षा सुनंदा तोगे, सचिव डॉ.लक्ष्मीकांत पारगांवकर, खजिनदार संदिप गांगर्डे, मुख्याध्यापिका रुपाली भोसले आदिंसह शाळेतील शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी दत्तात्रय शिंदे यांनी शाळेतील गरजू कुटूंबातील मुलीला दत्तक घेऊन वर्षभराचा शैक्षणिक खर्च उचलून मदतीची रक्कम विणा बोज्जा यांच्याकडे सुपूर्द केली. संदिप गांगर्डे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. वर्षा गांगर्डे व मनिषा लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. दिपाली भोसले यांनी आभार मानले.

मोदक बनवा स्पर्धेचा निकाल प्रथम- निलम वाल्मिक, द्वितीय-रेखा खत्री, तृतीय-उज्वला तरवडे, चतुर्थ- धनश्री सुरासे, पाचवा – तृप्ती निकुंभ आदिंना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी शाळेतील शिक्षिका सानिका कोते, सोनाली बडाख, गायत्री खेरनार, रानी उगले आदि शिक्षकांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा