पूरग्रस्तांसाठी केडगावमधील मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना

अहमदनगर- कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथील नागरिक हैराण झाले आहेत. पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत तर झालेच आहे. अनेक कुटुंबे या पुरामध्ये उद्ध्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीची गरज आहे.

मानवता हाच एक धर्म आहे, हे आता समाजाने दाखवून दिले आहे. मुस्लिम समाजबांधव बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतु अस्मानी संकटाने एका झटक्यात सगळ्यांना माणूस बनवले. आता कोणी हिंदू नाही, कुणी मुस्लिम नाही, कुणी मराठी नाही, मदत करणारी प्रत्येक जीवाची काळजी घेणारी फक्त माणसेच आहेत.

बकरी ईदनिमित्त केडगाव येथे शाही जामा मस्जिदमध्ये सर्व पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करून रोख स्वरूपात मदत गोळा करण्यात आली, तसेच सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईदनिमित्त कुर्बानीवर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन यावेळी मुस्लिम बांधवांच्यावतीने करण्यात आले.

यावेळी मौलाना मोहम्मद मोहसीन रजा, हाजी अकबर पठाण, हाजी उस्मान मणियार, अन्वर शेख, सिराज आतार, जावेद पठाण, रशीद शेख, मोहम्मद पठाण, अब्दुल पिरजादे शेख, मोहम्मद शेख यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी विश्वस्त हाजी उस्मान मणियार यांनी सांगितले की, केडगावमध्मे मुस्लिम बांधवांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी घरोघरी जाऊन मदत मदत मागितली जाणार असून, मानवता हाच खरा धर्म असून माणूस कोणत्या जातीचा किंवा धर्माचा आहे, याचा विचार करत बसण्यापेक्षा माणूस माणसाच्या कामाला येतो, हे निसर्गाने सर्वांना दाखवून दिले आहे. याचा विचार आता आपण सर्वांनी करायला हवा, असे ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा