प्रसूतिशास्त्राविषयी नगरमध्ये रविवारी कार्यशाळेचे आयोजन

नगर – जनरल प्रॅक्टिशनर व वैद्यकीय विद्यार्थी यांना प्रसूतिशास्त्रा संबंधी अद्यावत ज्ञान देण्यासाठी नगरमधील माऊली संकुल सभागृह येथे रविवारी (दि.8) एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र, भूलशास्त्र तसेच बालरोग शास्त्र या विषयांमधील तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेसाठी नगर जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्ह्यातून प्रॅक्टिशनर्सनी नाव नोंदणी केली असल्याची माहिती आयोजक स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्रतज्ञ डॉ. प्रदीप इंगळे यांनी दिली. या कार्यशाळेचा जास्तीत जास्त जनरल प्रॅक्टिशनर्सनी लाभ घेण्याचे आवाहन होमिओपॅथी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजय पवार, निमा अध्यक्ष डॉ. मिरगणे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या नाव नोंदणीसाठी तसेच अधिक माहितीसाठी स्नेहदीप हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन (0241- 2354100) येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा