काळे सायन्स अॅकॅडमीने साकारला हॉर्न बजानेकी बिमारी देखावा

भिंगार – भिंगारमधील काळे सायन्स अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे मंडळ असलेल्या एकलव्य सांस्कृतिक मंडळाने यावर्षी ‘हॉर्न बजाने की बिमारी’ हा एक सामाजिक व पर्यावरण देखावा सादर केला आहे.

सध्याच्या एकविसाव्या शतकात प्रत्येक घरामध्ये आणि घरातील प्रत्येकाकडे गाडी उपलब्ध आहे. शिवाय जवळपास चारचाकी सुद्धा प्रत्येक घरामध्ये आहे. पण गाडी चालविताना आपल्याकडून नकळत असंख्यवेळा हॉर्न वाजविला जातो. त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत होणारा त्रास हा गंभीर स्वरुपाचा आहे.

यामध्ये आणखी भर घालतात ते आजचे बुलेट गाडी चालविणारे तरुण. गाडीचे सायलेंसर बदलून कणकर्कश आवाज आणि अधून-मधुन फटाक्यांचे आवाज काढत प्रचंड त्रास हे तरुण देत असतात. या ज्वलंत विषयावर अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुर्त्या तयार करुन आरास बनविली आहे.

आरास संकल्पना प्रा.महेश घुले, सजावट इ. 8 वी ते 12 वी सायन्सचे विद्यार्थी, निवेदन प्रा.दिपाली सातपुते, मार्गदर्शन प्रा.सचिन काळे सर यांचे होते. भिंगारमधील नागरिकांनी ही आरास पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा