श्री जिव्हेश्वर भक्तसेवा मंडळातर्फे 13 ऑगस्टला जन्मोत्सव कार्यक्रम

अहमदनगर – साळी समाजाचे दैवत असलेले भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव मंगळवार 13 रोजी श्री भगवान जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळ, उपनगर सावेडीच्यावतीने श्री भगवान जिव्हेश्वर व शिव मंदिर, रविशंकर ध्यान मंदिरासमोर, गावडेमळा, पाईपलाईनरोड, सावेडी, नगर येथे समाजाचे स्वत:चे वास्तुमध्ये भक्तीमय वातावरणामध्ये साजरा करण्यात येणार आहे.

यादिवशी सकाळी श्री जिव्हेश्वर ग्रंथाचे वाचन ह.भ.प. विमलताई पाठक व बाळासाहेब पाठक करणार असून पादुका अभिषेक सौ. सलोनी व तेजस खिंडारी व सौ. सपना व मयुर खाडे व सौ. किरण व गणेश झिकरे यांच्या हस्ते करण्यात येईल. जन्मोत्सव गीत व पाळणा गायन हे श्री जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळ (महिला विभाग) यांच्या हस्ते होईल.

पालखीपूजन सौ. पुष्पलता व तुकाराम कांबळे व सौ. राधा व गोपाळ बारगजे यांच्या हस्ते करण्यात येऊन सकाळी 9.30 वा. पालखीची सवाद्य मिरवणूक निघणार आहे.

तसेच इ. 10 वी आणि 12 वी परीक्षेत तसेच पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती पात्र गुणवंत व विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण काशिनाथ झिकरे (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत व अविनाश पालवे यांच्या हस्ते 11 ते 1 यावेळेत होईल. तद्नंतर दुपारी 1 ते 3 या वेळेत होईल.

सर्व साळी समाजबांधव आणि हितचिंतक यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून आपली सेवा भगवान श्री जिव्हेश्वर चरणी अर्पण करुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जिव्हेश्वर भक्त सेवा उपनगर सावेडीचे अध्यक्ष श्रीनिवास कनोरे, पदाधिकारी व विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा