रिलायन्सची जिओ फायबर 5 सप्टेंबरपासून होणार लॉंच

700 रुपयांपासून सुपरडुपर फास्ट इंटनरेट स्पीड

मुंबई – ’प्रकाशाच्या वेगाचा स्पीड’ अशा शब्दात रिलायन्स उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या बहुप्रतिक्षीत जिओ फायबर योजनेची घोषणा आज केली. जिओच्या लॉंचिंगच्या तिसर्‍या वर्धापनदिनी म्हणजेच येत्या 5 सप्टेंबरपासून जिओ फायबर लॉंच होणार आहे. प्लान्स अगदी 700 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजची आज मुंबईत 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यात ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स फायबरमध्ये 1 जीबीपीएसपर्यंतचा अफाट इंटरनेटचा स्पीड ग्राहकांना मिळणार आहे. मुकेश अंबानी म्हणाले, ‘नव्या भारताचा उदय होतोय. भारताची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. गेल्या वर्षभरात रिलायन्सचे मोठी भरारी घेतली. जिओनं बाजारपेठेचा 32 टक्के हिस्सा व्यापला आहे. रिलायन्स हा सर्वाधिक आयकर भरणारा उद्योग समूह आहे.

’जिओ फायबरबद्दल अंबानी म्हणाले, ’1600 शहरांमधून 15 दशलक्ष लोकांनी गिगाफायबरची नोंदणी केली होती. जिओ फायबर प्रायोगिक तत्वावर सुरू केलं होतं. जिओ फायबरमुळे तुम्हाला प्रकाशाच्या वेगाचा ब्रॉडबँड स्पीड मिळेल. याव्यतिरीक्त अन्य अनेक स्मार्ट होम सुविधा आहेत.’

तंत्रज्ञानाच्या जगाचा आनंद जिओ फायबरमुळे ग्राहकांना लुटता येणार आहे. याचं एक उदाहरण म्हणजे मिक्स्ड रिअॅलिटी. ’ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीने तंत्रज्ञानाच्या जगात आमूलाग्र बदल घडवले. या दोहींचं मिश्रण असलेली मिक्स्ड रिअॅलिटी (R+VR) जिओ गिगाफायबरवर उपलब्ध होणार आहे,’ अशी घोषणा इशा अंबानी यांनी यावेळी केली. या मिक्स्ड रिअॅलिटीची एक झलकच त्यांनी एका व्हिडिओ क्लिपने व्यासपीठावर दाखवली.

रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून देशात सर्वाधिक मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याचे जाहिर केले. ही केवळ रिलायन्स नव्हे तर देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक असेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा