स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारतात शिक्षणाने क्रांती घडणार – कांतीलाल जाडकर 

अहमदनगर- स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारतात शिक्षणाने क्रांती घडणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाल्यास सक्षम पिढी घडून महासत्तेची पहाट उदयास येणार आहे. यासाठी सामाजिक भान ठेऊन वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जय मल्हार संस्था प्रयत्नशील असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल जाडकर यांनी व्यक्त केली.

क्रांती दिनानिमित्त जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने माळीवाडा येथील महात्मा फुले छात्रालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमात श्री. जाडकर बोलत होते.

गटई कामगार संघटनेचे अर्जुनराव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या सचिव निलम जाडकर, उपाध्यक्ष मुकेश दुधाडे, अजय जाडकर, वसतीगृहाचे गणेश कोरडे, सुभाष भावले, राजेंद्र इंगळे आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात निलम जाडकर यांनी संस्थेच्यावतीने विधवा, निराधार व वंचित घटक तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. अर्जुनराव तांबे म्हणाले की, सामाजिक कार्यासाठी ध्येयवेड्या माणसांची गरज आहे. माणुसकीच्या जाणीवेतून विचार बदलल्यास बदल घडणार असून, ही देखील मोठी सामाजिक क्रांती आहे. याच ध्येयाने जय मल्हार सामाजिक संस्थेचे कार्य चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

वसतीगृह चालविण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांचे हातभार लागत असल्याचे सांगून, संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे गणेश कोरडे यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा