श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त निमगाव वाघात अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात

अहमदनगर – नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्याचा प्रारंभ 17 ऑगस्ट पैठण येथील ह.भ.प. बारकु महाराज वीर यांच्या किर्तनाने झाले.

17 ते 24 ऑगस्ट या आठ दिवस चालणार्‍या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन निमगाव वाघा ग्रामस्थ, भजनी मंडळ व अ.भा.वारकरी मंडळाने केले आहे. आठ दिवस चालणा-या या धार्मिक कार्यक्रमात ह.भ.प. सिध्दनाथ महाराज राऊत (सुपा), ह.भ.प. विशाल महाराज हडवळे (जालना), ह.भ.प. रामचंद्र महाराज दरेकर (श्रीगोंदा), ह.भ.प. कृष्णा महाराज हडवळे (जालना), ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे (आळंदी), ह.भ.प. महेश महाराज मडके (नेवासा) यांचे किर्तन होणार आहे.

या सप्ताहात स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्यावतीने उपस्थित पाहुणे व किर्तनकार महाराजांना रोपे देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. शुक्रवार 23 रोजी रात्री गावात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. तर शनिवार 24 रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत ह.भ.प. भागवताचार्य सुनिल महाराज सोनवणे यांच्या काल्याचे किर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातंर्गत दररोज पहाटे काकडा भजन व सकाळी ज्ञानेश्‍वरी पारायण तर संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत हरिपाठ होणार आहे. रात्री 8 ते 10 वा. किर्तनाचा कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा अ.भा.वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख पै.नाना डोंगरे यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा