जैन ओसवाल पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचा अभिमान – मोहनलाल मानधना 

अहमदनगर- सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांनी स्थापन केलेल्या जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल कौतुकास्पद आहे. भाऊंनी निर्माण केलेल्या आदर्शांवरच संस्थेचा कारभार अतिशय उत्कृष्ट चालू आहे. पतसंस्थेचे चेअरमन मनोज गुंदेचा व व्हाईस चेअरमन ईश्वर बोरा हे आपल्याला मुलांप्रमाणेच असून ते आमचे पारिवारिक सदस्य आहेत. गेल्या दोन वर्षांपासून गुंदेचा व बोरा तसेच सर्व संचालक मंडळ संस्थेचा नावलौकिक आणखी वृध्दींगत करीत आहे. विशेषत: कर्ज वसुलीसाठी संचालक मंडळ विशेष प्रयत्न करून संस्थेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम करीत आहेत. संस्थेची ही वाटचाल आदर्शवत व अभिमानास्पद असून भविष्यात संस्था आणखी मोठी झेप घेईल, असा विश्वास माहेश्वरी ट्रस्ट व रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनचे विश्वस्त मोहनलाल मानधना यांनी व्यक्त केला.

मोहनलाल मानधना यांची अखिल भारतीय माहेश्वरी महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर तसेच अखिल भारतीय जाजू ट्रस्टवर नुकतीच निवड झाली आहे. यासह हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांची जैन वात्सल्य संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. दोघेही जैन ओसवाल पतसंस्थेचे ज्येष्ठ सभासद आहेत. त्यामुळे या निवडीबद्दल मानधना व बोरा यांचा सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने चेअरमन मनोज गुंदेचा व व्हाईस चेअरमन ईश्वर बोरा यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संचालक शैलश गांधी, विनय भांड, सी.ए.विशाल गांधी, सी.ए.संकेत पोखरणा, प्रमोद डागा, प्रकाश सुरपुरिया, मनसुखलाल कटारिया, सुभाष गांधी, प्रतिक बोगावत, उबेद शेख, रोहित गुप्ता, व्यवस्थापक प्रशांत भंडारी आदी उपस्थित होते.

अजित बोरा म्हणाले की, सहकारी बँकिंग व सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्त्व असलेल्या सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांच्या कार्याशी सुरुवातीपासून आपण जोडलेले होतो. पतसंस्थेच्या स्थापनेपासून आपण भाऊंसोबत होतो व संस्थेचे चेअरमनपदही भूषवले आहे. आज नवीन पिढी भाऊंनी घालून दिलेल्या आदर्शांवरच उत्तम कारभार करीत आहे, याचा विशेष आनंद होत आहे. संस्थेच्या दैनंदिन कारभारात थेट सहभाग नसला तरी बाहेरुन आपण संस्थेच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असतो. संस्थेचे पदाधिकारी व सर्व संचालक एकदिलाने व एकजुटीने कारभार करून भाऊंची शिस्तबध्दतेची व कुशल कारभाराची शिकवण तंतोतंत अंमलात आणत आहेत. भाऊंनी अध्यक्षपद भूषवलेल्या जैन वात्सल्य संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे सर्वांनी एकमताने सोपवली हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. भविष्यात जैन ओसवाल पतसंस्था तसेच वात्सल्य संस्था भाऊंचे कार्य पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न करेल. यावेळी चेअरमन मनोज गुंदेचा व व्हाईस चेअरमन ईश्वर बोरा यांनीही मानधना व बोरा या ज्येष्ठांचे मार्गदर्शन, आशिर्वाद आमच्यासाठी बहुमोल असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास संस्थेचे सभासद, कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा