जैन समाजातील गरजू भगिनींना सक्षम करण्याचा प्रयत्न – सतीश लोढा

जैन कॉन्फरन्सच्यावतीने गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप

अहमदनगर – ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या मानवसेवा योजनेंतर्गत संपूर्ण देशामध्ये गरजू कुटूंबियांना मदतीचा हात देत आहोत. जैन कॉन्फरन्सच्या नगर शाखेच्यावतीनेही सर्व मानवसेवेचे सर्व उपक्रम राबविले जात असून. कुटूंबातील स्त्री जर सक्षम असले तर कुटूंबही सक्षम होते. म्हणूनच जैन समाजातील गरजू भगिनीला सक्षम करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी व मानवसेवा प्रकल्पाचे अध्यक्ष रमण लुंकड, महामंत्री लादूराम बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात हा मानवसेवा प्रकल्प राबवत आहोत. नगरमध्येही यापूर्वी अनेक गरजूंना आर्थिक मदत दिली आहे. आता आधुनिक सिलाई मशिन देऊन महिलांना स्वत:च्या पायावर उभे करत आहोत, असे प्रतिपादन ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे मंत्री सतीशबाबू लोढा यांनी केले.

ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्यावतीने वरिष्ठ राष्ट्रीय मार्गदर्शक विलास लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली जैन समाजातील 7 गरजू महिलांना आधुनिक सिलाई मशिन देण्यात आल्या. यावेळी कॉन्फरन्सचे मंत्री सतीशबाबू लोढा, महाराष्ट्र युवा अध्यक्ष धनेश कोठारी, सदस्य मनोज शेटीया, राजेंद्र बोथरा, अजित कर्नावट आदिंसह महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलतांना धनेश कोठारी म्हणाले, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे वरिष्ठ राष्ट्रीय मार्गदर्शक विलास लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शाखा काम करत आहे.

विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच गरजूंपर्यंत थेट मदत पोहचवत आहोत. मानवसेवेतून समाजसेवा हाच सामाजिक दृष्टीकोन यामागे आहे. प्रास्तविकात मनोज शेटीया यांनी जैन कॉन्फरन्सच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा