नगरच्या आयटी पार्कमध्ये नव्याने चार आयटी कंपन्या दाखल

आणखी 100 तरुणांना मिळणार रोजगार; आ. संग्राम जगताप यांची माहिती

अहमदनगर- नगरच्या एमआयडीसीमध्ये सुरू करण्यात आलेल्या आयटी पार्कमध्ये सध्या नऊ कंपन्या कार्यरत असून नव्याने चार कंपन्या सुरू होत आहेत. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रसिद्ध असलेली आरएफआयडी ही कंपनी नगरमध्ये प्रथमच येत असून यामुळे आणखी शंभर तरुणांना नव्याने रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

अहमदनगर एमआयडीसीमध्ये नव्याने चार कंपन्या दाखल होत आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ. संग्राम जगताप बोलत होते. यावेळी उद्योजक नरेंद्र बंडारू, शशी घिगे, गौरव नाय्यर, राजेश आठरे आदी उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप म्हणाले, नगरमधील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यात जावे लागत होते. आपल्या तरुणांना येथेच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी एमआयडीसीमध्ये धुळखात पडून असलेल्या आयटी पार्कमध्ये मागील महिन्यात नऊ कंपन्या सुरू केल्या. यामध्ये नव्याने चार कंपन्यांची भर पडली आहे. या कंपन्याच्या माध्यमातून स्वॉफ्टवेअर, डेव्हलपेंट, सीसीटीव्ही कॅमेरे आदी प्रकारचे साहित्य तयार करण्यात येणार आहे. नव्याने आलेल्या चार कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे शंभर तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यापुढेही आणखी काही कंपन्या नगरमध्ये येण्यास इच्छुक असून त्यांच्याशीही चर्चा सुरू असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

या आयटी पार्कचे उद्घाटन 25 ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. तेथे सध्या 350 युवक कार्यरत आहेत. त्यात अजून 100 युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

डिसेंबरपर्यंत सुमारे 1 हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा