दुर्लक्षित घटकांचे प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत – महापौर बाबासाहेब वाकळे 

अहमदनगर- नगरमध्ये आज अनेक सामाजिक संस्था वंचित दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहेत. त्याचा या घटकांना फायदा होत असल्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अशा सामाजिक संस्थांकडून होत आहे. इनरव्हील क्लबच्यावतीनेही अशाच प्रकारचे काम नगरमध्ये होत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक तर केलेच पाहिजे परंतु अशा कामात प्रत्येकाने योगदानही दिले पाहिजे. त्यामुळे दुर्लक्षित घटकांचे प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल. आज जी मदत इनरव्हील क्लबच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण दुर होणार असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्यावतीने सावेडी येथील महात्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक रविंद्र बारस्कर, मनपा प्रशासनाधिकारी सुभाष पवार, डॉ.सतीश सोनवणे, जुबेर पठाण, इनरव्हीलच्या अध्यक्षा प्राजक्ता डागा, उपाध्यक्षा अर्पिता शिंगवी, सचिव खुशबु बायड, मुख्याध्यापिका श्रीमती गोरे, आदि उपस्थित होते.

याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्राजक्ता डागा म्हणाल्या, इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकार्‍यांच्यावतीने नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज याठिकाणी ही मदत देण्यात आली आहे. क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांचे मोठे सहकार्य सर्वच उपक्रमांना मिळत असते. क्लबचा मुळ उद्देशाच हा समाजाची उन्नत्ती हा आहे. त्यामुळे दुर्लक्षित घटकांसाठी आम्ही सर्व एकत्र येऊन हे काम करत आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या उद्देशाने हा प्रोजेक्ट राबविला आहे. पुढील काळातही शाळेची डागडुजी व रंगकाम करण्याचा आम्ही प्रयत्न करु असेही अध्यक्षा डागा यांनी सांगितले.

याप्रसंगी सचिव खुशबु बायड म्हणाल्या, इनरव्हील क्लबच्यावतीने सामाजिक दायित्व जपत आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना मदत करण्यासाठी क्लबचे सदस्य नेहमीच तत्पर असतात. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी क्लबच्यावतीने मदत करण्यात येत आहे.

याप्रसंगी डॉ.सतीश सोनवणे, रविंद्र बारस्कर, सुभाष पवार आदिंनी मनोगत व्यक्त केले. स्वाती गांधी यांनी क्लबच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन अभय ठाणगे यांनी केले तर आभार अर्पिता शिंगवी यांनी मानले. यावेळी 106 विद्यार्थ्यांनी दप्तर, बुट, वह्या, कंपास, रंगीत खडू, चित्रकला वही आदि साहित्य देण्यात आले. यावेळी डॉ.सतीश सोनवणे, हिमगौरी गुमास्ते, रुची श्रीवास्तव, मनी नल्ला, सुमन साहू, गौरी खटोड, गीता काटकर, सरोज गांधी आदिंचे विशेष सहकार्य लाभले.

इनरव्हील क्लबच्या कल्पना गांधी, भाविका चंदे, स्वाती गांधी, प्रगती गांधी, रितू पांडे, योगिता मुथा, डॉ.मानसी मानोरकर, सोनल फिरोदिया, विणा मुंगी, वैशाली गुगळे, कोमल वाधवा, डॉ.रश्मी आरडे, रश्मी दसरे, स्मिता पाठक आदि उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा