टिळकरोड यंग पार्टीचे विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद – आ. अरुण जगताप

मोहरमनिमित्त यंग पार्टीच्यावतीने इमामवाडा येथे भंडारा वाटप

अहमदनगर- समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करणे व अनाथांना आधार देणे ही काळाची गरज आहे. टिळकरोड यंग पार्टीच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच समाजात जातीय सलोखा कायम टिकून राहावा यासाठी प्रयत्न केले जातात, ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आ. अरुण जगताप यांनी केले.

मोहरमच्या 7 वी निमित्त टिळकरोड यंग पार्टीच्यावतीने शनिवारी (दि.7) दुपारी इमामवाडा येथे भंडारा वाटपाचा शुभारंभ आ. अरुण जगताप व शहर बँकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे पो. नि. प्रविण भोसले, अन्वर कादरी, फैरोज शेख, अनिस शेख, दत्ता साठे, दिनेश कांबळे, मनोहर जिंदम, आसीफ शेख, साजीद शेख, सुनिल डिंबळे, गणेश कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुभाष गुंदेचा म्हणाले, टिळक रोड यंग पार्टीच्यावतीने यतीमखाना येथील अनाथ मुलांना नेहमीच मदत केली जाते. अन्न, वस्त्र व निवारा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याला तो मिळायलाच हवा. यादृष्टीने हे सर्व युवक येथे मदत करत असतात. जीवनात एकमेकांनी एकमेकांना मदत करायला हवी. दानशुरांनी पुढे येऊन मदत केल्यास समाजातील प्रश्न दूर होण्यास मदत होईल. सामाजिक संस्था शहरात चांगल्या काम करीत असून, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरांनी काम केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येईल, असे ते म्हणाले.

अन्वर कादरी म्हणाले समाजातील गरजूंना आधार देण्याबरोबरच धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा