राशिभविष्य

 

मेष – पैसा खर्च होईल. संततीबरोबर मतभेद किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. सामाजिक क्षेत्रात अपयश येणार नाही याकडे लक्ष द्या.

वृषभ – नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस. मित्रांबरोबर दिवस आनंदात घालवाल. मागील देणी वसुल होतील.

मिथुन – विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस वाटणार नाही. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. आध्यात्मिकतेतून शांती मिळेल.

कर्क – मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहली यातूनही आज आनंद मिळवू शकता.

सिंह – आध्यात्मिकतेच्या मदतीने विचारातील नकारात्मकता दूर करा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल.

कन्या – स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबातील लोकांशी मतभेद संभवतात. मिळणार्‍या फायद्यात नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्या.

तूळ – देण्या-घेण्याचे निर्णय विचारपूर्वक घ्या. अपघात व गैरसमज यापासून दूरच राहा. वाहने सावकाश चालवावीत.

वृश्चिक – शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

धनु – आज अध्यात्माकडे कल राहिल. जुने मित्र व नातेवाईक यांच्या सहवासामुळे दिवस आनंदात व्यतीत होईल. तब्येत सांभाळा.

मकर – उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवून कार्ये शांततेत केल्यास आजचा दिवस हा यशदायी ठरेल. उधारी वसुल होईल.

कुंभ – हितशत्रुंपासून पिडा संभवते. संततीसौख्य लाभेल. कोर्ट-कचेरी आदी गोष्टींपासून लांब रहा.

मीन – आर्थिक व्यवहार करताना अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास ठेवू नका. आध्यात्मिक आनंदही आज आपल्या जीवनात भरून राहील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा