वास्तू

0

नंदादीपाचे तोंड पश्चिम वा दक्षिण
दिशेला कधीही ठेवू नये. ते निःसंशय
हानीकारक आहे.

सल्ला

0


परफ्यूमचे डाग घालविण्यासाठी
कपड्यांवर परफ्यूमचे डाग पडले
असतील तर त्यावर थोडे स्पिरिट चोळा. डाग
नाहीसे होतील.

आरोग्य

0

डोळ्यांच्या आरोग्यासाठी

जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांचे स्वास्थ्य चांगले राहते.
तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे. पालकाच्या सेवनाने
रक्तदाब नियंत्रणात राहतो. अंगावर गाठ येऊन सूज आली असेल, तर अशा वेळी पालकच्या
पानांचे पोटीस गरम करून त्या जागी बांधावे.

पालक भात

0

पालक भात


साहित्यः चार वाट्या बासमती तांदूळ, पालकाच्या दोन जुड्या, दोन वाट्या बारीक
चिरलेला कांदा, पंधरा-वीस लसूण पाकळ्या, पाव किलो पनीर, एक मोठा चमचा लिंबाचा
रस, एक चमचा तिखट, एक मोठा चमचा आल्याचा कीस, एक मोठा चमचा हिरव्या
मिरचीचा ठेचा, एक वाटी भिजलेले शेंगदाणे, चवीला मीठ, एक मोठा चमचा गरम मसाला,
अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी तूप, एक मोठा चमचा शहाजिरं.

तयारी : तांदूळ धूऊन ठेवावेत. पालक निवडून धुऊन बारीक चिरावा. पनीरचे तुकडे
करून त्यांना मीठ, तिखट लिंबाचा रस लावून ठेवावा.

कृती : तूप तापवून शहाजिरं घालावं आणि धुतलेले तांदूळ परतावे. सहा वाट्या
उकळतं पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून भात शिजवून घ्यावा. भात मोकळा करून
पसरावा आणि त्यावर गरम मसाला घालून भात कालवून घ्यावा. तेल तापवून त्यात
लसूण परतावा. आलं मिरची घालून परतावं. कांदा घालावा. कांदा परतून झाल्यावर पालक
घालावा. झाकण न ठेवता शिजवून घ्यावा. पनीरचे तुकडे मसाल्यासकट घालून भाजी
कोरडी झाली की त्यात भात घालून हलया हातानं ढवळून एक वाफ द्यावी

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १ डिसेंबर २०२३

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, पुनर्वसु १६|४० सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. १३ मि.

राशिभविष्य

मेष : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्ट्या वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. कार्यालयातील वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यास कामातील समस्या दूर होतील.

वृषभ : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. इतरांची देणी आपण परत कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल.

मिथुन : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका.

कर्क : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

सिंह : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. यंत्रे व वाहने जपून चालवावीत.

कन्या : अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. हितशत्रुंकडून त्रास संभवतो.

तूळ : आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक : आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. अनेक प्रकारच्या अडचणी संभवतात.

धनु : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. आर्थिक स्थिति सुदृढ राहील. यश वाढेल. दिवस कालच्या दिवसाइतका आनंदी जाणार नाही.

मकर : आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही. राहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते.

कुंभ : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा. पितृचिंता सतावेल. धाकट्या भावंडांची शैक्षणिक चिंता राहिल.
मीन : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितीत बचत आणि निवेशाचे

योग येतील. लाभदायी करार होतील. जुन्या गुरुजन वर्गाची भेट होईल.

                                                                                       संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

फाफडी

0

फाफडी

साहित्य : तांदूळ पिढी २ वाट्या,
बेसन १ वाटी, मीठ, तिखट, जिरे पूड व
ओवा पूड प्रत्येकी अर्धा टी स्पून, मोहन १ टे.
स्पून, तळणीस तेल.
कृति : तळणीचे तेल सोडून सर्व
जिन्नस एकत्र करा. घट्ट मळा. एकीकडे तेल
तापत ठेवा.
पोळपाटावर पातळ पोळी लाटा. सुरीने
तिच्या उभ्या पट्ट्या कापा व गरम तेलात
तळा.

चेहरा सतेज राहण्यासाठी

सौंदर्य

 

* आपली त्वचा ऑईली असेल, तर
चमचाभर गुलाब पाण्यात चमचाभर लिंबाचा
रस मिसळून कापसाने चेहरा स्वच्छ करा.
आठवड्यातून दोन वा तीन वेळा या लिंजरचा
वापर केल्यास तेलकटपणा कमी होईल व
चेहराही काळा पडणार नाही.
* उडीद डाळीची पावडर बनवून त्यात
थोडेसे गुलाबपाणी, ग्लिसरीन व बदाम रोगन
मिसळून चेहर्‍यावर लावावे.

वास्तू

0

जर घरात प्रवेश करण्यापूर्वी भिंत आड
येत असल्यास गणेशाचा फोटो लावावा. एक
स्वस्तिक चिन्ह लावावे.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०२३

संकष्ट चतुर्थी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, आर्द्रा १५।०१ सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. १६ मि.

 

राशिभविष्य

मेष : कामांची प्रशंसा होईल. भागीदारीपक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. जोखमीची कामे टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील.

वृषभ : अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा योग. उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो.

मिथुन : उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. आपले काम धाडसाने करा.

कर्क : उत्तम वाहनसुख. तब्बेतीत सुधारणा. धार्मिक कार्यात वेळ जाईल. काळजीपूर्वक काम करा. महत्वाचे काम
टाळा.

सिंह : कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील.पाठबळ मिळेल. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात.

कन्या : मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.

तूळ : आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याचा प्रयत्न करा. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल.

वृश्चिक : मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील.

धनु : वेळ मनोरंजनात व्यतीत होईल.  प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. कामाचा भार अधिक राहील. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.
मकर : मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. व्यवसायिकांना दिवस संमिश्र. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील.

कुंभ : काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील.

मीन : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. देवाण-घेवाण टाळा. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल.

 

                                                                                   संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

0

जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये ?

जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात
नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊन करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.
जेवण घेताना आपल्या जेवणात गोड पदार्थ हटकून असतात, मात्र काही वेळा आपण प्रथम गोड
पदार्थ खाण्यावर भर देतो. तो चुकीचा आहे.