चोरीचा आरोप करून महिलेस मारहाण

अहमदनगर – मोबाईल व बोरमाळ चोरल्याचा खोटा आरोप करीत तिघांनी 25 वर्षीय महिलेस शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने, काहीतरी हत्याराने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना लालटाकी येथील भारस्कर कॉलनी येथे मंगळवारी (दि.17) रात्री 10 च्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की, मारिया पांडुरंग लोखंडे (वय 25, रा. लालटाकी, भारस्कर कॉलनी, नगर) यांनी मोबाईल व बोरमाळ चोरल्याचा खोटा आरोप अंजली राजु शिरसाठ, गणेश राजु शिरसाठ व पाप्या राजु शिरसाठ (सर्व रा. लालटाकी) यांनी केला आणि मारिया हिस लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने व काही तरी हत्याराने जखमी केले.

या प्रकरणी मारिया लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 323, 324, 504 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास महिला पोलिस नाईक पठारे या करीत आहेत.