भिंगारमध्ये एकास मारहाण

अहमदनगर- आंतरजातीय विवाह केला म्हणून घराबाहेर का काढले? अशी विचारणा करुन शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने डोक्यात मारुन जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि.13) दुपारी 1.30 वाजता भिंगार येथील राधानगर लक्ष्मीनगर येथे घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, राज रतेश पवळ (वय 20) व त्याचा चुलत भाऊ सनी पवळ (दोघे रा.राधानगर लक्ष्मीनगर, भिंगार) हे दोघे घरासमोर उभे असताना तेथे रमेश शांताराम पवळ (रा.जामखेड रोड) हा त्यांच्याजवळ आला व म्हणाला, ‘‘मी आंतरजातीय विवाह केल म्हणून तुम्ही मला घराबाहेर का काढले?’’ असे म्हणून शिवीगाळ करू लगला. त्यावर राज याने ‘’तू शिवीगाळ करू नको’’, असे म्हटले याचा राग येवून रमेश याने त्याच्या अॅव्हिएटर गाडीतून लोखंडी रॉड बाहेर काढून सनी पवळ याच्या डोक्यात मारुन शिवीगाळ केली तसेच राज याच्या मांडीवर, हातावर मारहाण केली. या मारहाणीत राज व सनी दोघे जखमी झाले.

याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी राज पवळ यांच्या फिर्यादीवरुन भारतीय दंड विधान कलम 324, 504 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास हे.कॉ. धामणे हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा