कोठल्यात मारामारी

अहमदनगर – हॉटेलमध्ये चहा पित बसलेल्या दोघांना सहा जणांच्या जमावाने शिवीगाळ करीत लोखंडी रॉड व लाथा- बुक्यांनी व चाकुने मारहाण करीत जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.11) 8.30 च्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अनिस अली सय्यद (वय 23, रा. छोटी मस्जिद जवळ, मुकुंदनगर) हा व त्याचा चुलत भाऊ बिलाल सईदमियॉं सय्यद हे दोघे कोठला येथील हॉटेल गुलशनमध्ये चहा पीत बसलेले असताना तेथे मजहिद रईस सय्यद, शेख जाकीर अब्दुलगनी, शादाब पठाण उर्फ हायब्रीड, मजिद रईस सय्यद, फैजान शेख, तनवीर शेख (सर्व रा. आलमगीर, भिंगार) हे जमावाने आले व काही एक कारण नसताना अनिस व बिलालला शिवीगाळ करीत त्यांनी लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने व चाकुने मारहाण केली. या मारहाणीत दोघे जखमी झाले.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अनिस सय्यद यांच्या फिर्यादीवरून भादंविक 326, 324, 323, 143, 147, 148, 149, 427, आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पो.ना. जाधव हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा