अनेक गुणांनी युक्त नारळ

भारतात नारळ या फळाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. जवळजवळ प्रत्येक शुभकार्यात नारळ आवश्यक असतो.नारळाला केवळ धार्मिकदृष्ट्याच महत्त्व नाही. तर ते आरोग्यासाठी सुद्धा खूपच लाभदायक आहे. याचे महत्त्व आयुर्वेदानेही मान्य केले आहे.

नारळातील अनेक गुण त्याला आरोग्यदायी ठरवतात. अनेक शारीरिक विकार याच्या सेवनाने बरे होतात. त्यादृष्टीने हे अत्यंत गुणकारी असे फळआ हे. खरे तर नारळाचे झाड म्हणजे कल्पवृक्ष असे म्हणतात. आयुर्वेदाच्या अनुसार, नारळ जड, स्निग्ध,शीतल, वीर्यवर्धक, बस्तिशोधक, बलकारक, पौष्टिक,कफकारक, स्वादिष्ट, बुद्धीवर्धक, हृदयासाठी हितकारी, पित्तनाशक, मदकारक, श्रमनाशक,कामशक्ती वाढविणारे आहे.

कोवळा नारळ :

पित्त रक्तविकार, तुषा,वमन, दाह आणि रक्त पित्तापासून उत्पन्न रोगांना हा नारळ लवकर नष्ट करतो.

पिकलेला नारळ :

दाहकारक, पित्तजनक, जड,मलरोधक, रुचिदायक, मधुर व बलवर्धक आहे.

सुका नारळ :

कठिणतेने पचणारा जड, स्निग्ध,मलरोधक तसेच बलवीर्य आणि रूचि उत्पन्न करतो.

नारळाचे दूध :

बलकारक, रूचिकारक, स्वादिष्ट,स्निग्ध, वीर्यवर्धक, किंचित गरम तसेच बात, कफ,गुल्म व खोकला दूर करते. उदरशूलमध्ये नारळाचे दूधलाभदायक आहे. उन्हाळ्यामध्ये स्वास्थ्यासाठी नारळ लाभदायक आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा