बहुपयोगी काकडी

लो कॅलरीज् आणि पाण्याचा साठा यामुळे डाएट करणार्‍या लोकांसाठी काकडी उत्तम आहे. शरीराला नको असलेले द्रव्यपदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे काम काकडी करते. तोंडाला दुर्गंधी येत असेल तर काकडीची चकती तोंडात वरच्या भागात जिभेच्या साहाय्याने थोड्या वेळासाठी धरून ठेवावी.

सकाळी उठल्यावर डोकं दुखत असेल तर किंवा फ्रेश वाटत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी काकडीच्या फोडी खाव्यात. मधुमेहींसाठीसुद्धा काकडी उपयुक्त आहे. काकडीत असलेल्या स्टेरॉल्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करायला मदत होते. काकडीत पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर असल्यामुळे रक्तदाब सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच स्नायूंचे दुखणे, पायात वात येणे यासारखे विकार दूर करण्याची क्षमता यात असते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा