स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र आरोग्य सखी

चाळिशीनंतरही टिकवा तारुण्य

त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. बर्‍याच स्त्रिया या वयात शरीर साथ देत नसल्यामुळे बाहेरचे पदार्थ किंवा पटकन होणारे फास्टफूड खातात. परंतु त्यामुळे शरीराचे योग्य पोषण होत नाही. चुकीच्या आहारामुळे अनेक आजार निर्माण होतात. म्हणूनच ताजा व सकस आहार घ्यावा.

विहार : आयुष्यभर धावपळ केल्यानंतर या वयामध्ये आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वभाव शांत ठेवावा. आध्यात्मिक कार्यामध्ये आवर्जून भाग घ्यावा; आध्यात्मिक वातावरणामुळे मन:शांती मिळते. तसेच ॐकार, प्राणायाम, ध्यानधारणा, योगासनांपूर्वीच्या सूक्ष्म क्रिया, मोकळ्या हवेत फिरायला जाणे असा व्यायाम करावा. या वयात गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास खूप जाणवतो. व्यायामामुळे हा त्रास कमी होतो, सांध्यांमध्ये लवचीकता निर्माण होते. अनेकदा मन अस्थिर व चंचल होते. त्यामुळे विस्मरण होते.

व्यायामामुळे मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो व विस्मरण होत नाही. मन एकाग्र होते. आपल्या बरोबरच्या मैत्रिणींशी समरस होऊन गप्पा मारायला हव्यात. त्यामुळे भावना व्यक्त करण्यास वाव मिळतो. एकमेकींचे सुखदुःख समजून घेतल्यामुळे मनाची संकुचित वृत्ती कमी होते. दुसर्‍यांना मदत करण्याची भावना वाढीस लागते. या वयामध्ये सामाजिक कार्यात भाग घ्यावा. गृहस्थाश्रमाची जबाबदारी सुनेवर सोपवून वेगवेगळ्या सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या पतीसोबत आनंदाने जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा.

ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या, त्या कराव्यात. निसर्गसौंदर्य पाहणे, सिनेमा बघणे, बागेमध्ये फेरफटका मारणे, चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे, रेडिओ ऐकणे, संगीत ऐकणे, टीव्हीवरील चांगल्या मालिका पाहणे, वृद्धाश्रमांना, अनाथालयांना भेटी देणे अशा गोष्टी कराव्यात. त्याचबरोबर स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. महिन्यातून एकदा डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाब, रक्तातील साखर तपासून घ्यावी.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा