स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

थायरॉइड म्हणजे नेमके काय?

या उपचारांमुळे विकाराची लक्षणे कमी होण्यास मदत होते. थायरॉक्झिन गोळीची मात्रा कमी होते. हा आजार नुकताच झालेला असेल व त्याचप्रमाणे कमी असेल, तर वरील उपचारांनी लक्षणे कमी होऊन उपशय मिळतो. सहा महिन्यांतून एकदा थायरॉइडची रक्त तपासणी करून घ्यावी.

हायपरथायरॉडिझम म्हणजे काय?

थायरॉइड ग्रंथीचे अंत:स्राव जास्त प्रमाणात तयार होण्यालाच हायपरथायरॉडिझम असे म्हणतात. या ग्रंथीचे स्राव जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया विकृत स्वरूपात कार्य करू लागते. त्यामुळे घेतलेल्या आहारापासून शरीराचे पोषण होत नाही. घेतलेल्या आहाराचे लगेच पचन होते. वारंवार भूक लागते. शरीराचे पोषण न झाल्यामुळे वजन कमी होते.

रुग्णास थकवा जाणवतो. कारणे TSH हार्मोन्स T3, T4 हार्मोन्स योग्य प्रमाणात तयार करण्याचे काम करते. परंतु काही कारणाने पियुषिका ग्रंथीचा ताबा न राहिल्याने हे T3, T4 हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होते व T3, T4 हार्मोन्स प्राकृत प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो व खाल्लेल्या अन्नाचे लगेच पचन होऊन रुग्णाला पुन्हा भूक लागते. वारंवार आहार घेतला तरी काहीच खाल्ले नाही असे वाटते. त्यामुळे रुग्णाला थकवा व अशक्तपणा जास्त प्रमाणात जाणवतो. रक्त तपासणी : या आजाराचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी करावी लागते.

लक्षणे – 1) उष्णता सहन न होणे 2) उदास वाटणे 3) मानसिक स्थैर्य नसणे 4) छातीत धडधडणे 5) अति प्रमाणात भूक लागणे 6) दम लागणे 7) झोप न येणे 8) मासिक पाळी अनियमित होणे किंवा पाळीमध्ये कमी रक्तस्राव होणे 9) हृदयाचे ठोके वाढणे 10) चक्कर येणे, खूप थकवा वाटणे 11) एक ते दोन महिन्यांत अचानक 10 किलोपर्यंत वजन कमी होणे 12) मोठ्या प्रमाणात केस गळणे 13) त्वचा नेहमी गरम व ओलसर राहणे 14) हाताचा थरकाप होणे 15) डोळे खोबणीच्या बाहेर आल्यासारखे वाटणे.

उपचार : औषधोपचार, रेडिओ आयोडिन उपचार, शस्त्रक्रिया हे सर्व उपचार आजाराची लक्षणे किती प्रमाणात आहेत यावरून तज्ज्ञ ठरवतात.

1) औषधोपचार – यामध्ये थायरॉइड हार्मोन्सचे प्रमाण प्राकृत राहण्यासाठी अॅन्टिथायरॉइड मधील निओमरकॅझोल किंवा मेथिमॅझोल ही औषधे वापरली जातात. त्यामुळे अति प्रमाणात तयार होणारे T3, T4 हे हार्मोन्स प्राकृत प्रमाणात तयार होतात. रुग्णांची त्रासदायक लक्षणे कमी होऊन रुग्णास आराम वाटतो. 2) रेडिओ आयोडीन उपचार पद्धती – ज्यावेळी रुग्णामध्ये थायरॉइड ग्रंथीचा कर्करोग होऊन हायपरथायरॉडिझमची लक्षणे दिसू लागतात. त्यावेळी या थेरपीचा वापर करतात. यामुळे विकृत वाढणार्‍या कर्करोगांच्या पेशी नष्ट होतात. 3) शस्त्रक्रिया – जेव्हा रुग्णास औषधोपचार लागू पडत नाहीत त्यावेळेस तज्ज्ञ आवश्यकतेनुसार थायरॉइड ग्रंथीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.

ध्यानधारणा, योग, प्राणायामाचे महत्त्व – खरे तर स्त्रियांना थायरॉइड ग्रंथीचा विकार बर्‍याच जशी अति शारीरिक व मानसिक ताणामुळे उद्भवतो.

 डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स.9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा