आहारात असावे पौष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक केळ

केळ हे एक स्वादिष्ट आणि स्वास्थ्यवर्धक फळ आहे. दररोज दोन केळी खाऊन वरून दूध पिल्यास दुबळ्या व्यक्तीचे वजन वाढते. केळामध्ये शर्करा असते परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी केळे नुकसानकारक नाही.

यातील शर्करेने शरीरातील स्नायूंचे योग्य पोषण होते, ज्यामुळे कमजोरी येत नाही. केळाने भूक वाढते. केळ आतड्यांना मजबुती देते. तसेच आतड्यांतील जिवाणू नष्ट करून शरीराची रोग प्रतिरोधशक्ती वाढविते. केळाचे नियमित सेवन करणारी व्यक्ती वारंवार आजारी पडत नाही.

अमांशामध्ये केळांचा उपयोग अत्यंत लाभकारी आहे. जोरात जुलाब होत असल्यास दह्याबरोबर केळे घेतल्यास पाचन ठीक करते. केळाच्या फलाहाराने पाचनशक्ती सुरळीत राहते. लहान मुलेही केळे मोठ्या आवडीने खातात.

आपणाकडे पाहुणे आल्यास फळांच्या रूपात केळी देणे अधिक पसंत करतात. केळाचे हे बहुविध उपयोग लक्षात घेऊन केळाचा आपल्या आहारात उपयोग करता येईल. शरीराची शक्ती वाढविण्यासाठी केळाचे सेवन अवश्य करावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा