माजी नगरसेवकांसह इतरांची खंडपीठात हद्दपारी स्थगित

अहमदनगर- मोहरम व गणेशोत्सव निमित्ताने माजी नगरसेवक आरिफ रफिउद्दीन शेख, सज्जाद जमिर सय्यद (वेल्डर), मोहसिन मन्सूर शेख व शाहदाब आरिफ शेख यांच्या विरुद्ध हद्दपार केल्याच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनवणे यांनी स्थगिती दिली.

उपविभागीय दंडाधिकारी नगर यांनी भिंगार कॅम्प पोलीसांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार उपरोक्त चौघांची 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून निघून जाण्याचा सक्त इशारा देऊन आदेश पारित केला होता. याचिकाकर्त्यांच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात अॅड. एन. बी. नरवडे यांनी काम पाहिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा