नगरच्या डॉ.सारंग गुंफेकर यांची आयआयटीमध्ये प्राध्यापकपदी नेमणूक

अहमदनगर- सावेडी उपनगर शिलाविहार येथील डॉ. सारंग प्रकाश गुंफेकर यांची आयआयटी रोपर (रुपनगर) पंजाब येथे प्राध्यापक पदावर नेमणूक झाली आहे. त्यांनी केमीकल इंजिनिअरींगमध्ये पीएच. डी. शिक्षण कॅनडा येथे उच्च शिक्षण घेतले आहे. ते श्री समर्थ विद्या मंदीर, सावेडी व पेमराज सारडा महाविद्यालय व्हि.आय.टी येथील माजी विद्यार्थी आहेत.

सीक्युएव्ही अहमदनगर येथील निवृत्त कार्यालय अधिक्षक प्रकाश गुंफेकर यांचे डॉ.सारंग हे चिरंजीव आहेत.