सोने ठेवा, पैसे कमवा !

आपण घरात ठेवलेल्या सोन्यावरही पैसा कमावू शकता. यासाठी एसबीआयने योजना आणली आहे. यानुसार आपण घरात ठेवलेले सोने बँकेत जमा करुन पैसा कमवू शकतो आणि सोने देखील अधिक सुरक्षित ठेऊ शकतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिवॅम्प्ड गोल्ड डिपॉझिट स्किमनुसार आपण बँकेत सोन्याच्या दागिण्यांची एफडी करु शकता. यातून सोने सुरक्षित राहू शकते आणि त्यावर व्याजही मिळू शकते. एफडी केलेल्या सोन्यावर आपल्याला कर देखील भरावा लागत नाही. गरज भासल्यास या आधारावर कर्ज देखील सहजपणे मिळू शकते.

किती मिळेल व्याज ? : एसटीबीडी श्रेणीनुसार सोन्याची एक वर्षासाठी मुदत ठेवी केल्यास 0.50 टक्के व्याज दिले जाते. तर दोन वर्षे आणि तीन वर्षाच्या मुदत ठेवीसाठी अनुक्रमे 0.55 आणि 0.60 टक्के व्याज दिले जाते. याशिवाय एमटीजीडी श्रेणीनुसार 2.25 टक्के दराने दरवर्षी व्याज दिले जाते. त्याचवेळी एलटीजीडी श्रेणीनुसार सोन्याची मुदत ठेव केल्याने 2.5 टक्के वार्षिक दराने व्याज दिले जाते.

किती सोने ठेवू शकता?: रिवॅम्ड गोल्ड डिपॉझिट स्किमनुसार ग्राहकांना कमीत कमी 30 ग्रॅम सोने ठेवता येऊ शकते. अर्थात कमाल मर्यादा कोणतिही नाही. आपण कितीही सोने बँकेत ठेवून व्याज मिळवू शकता.

मॅच्यूरिटीचा कालावधी किती असेल?: या योजनेनुसार एसबीआयने तीन श्रेणी आणल्या आहेत. पहिल्या श्रेणीत 1 ते 3 वर्षासाठी सोने जमा केले जाते. यात शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (एसटीबीडी) असे म्हटले जाते. दुसर्‍या श्रेणीत मीडियम टर्म गर्व्हनमेंट डिपॉझिट (एमटीजीडी) असे म्हटले जाते. त्याचा मॅच्यूरिटीचा कालावधी हा 5- 7 वर्षाचा आहे. त्याचवेळी लॉंग टर्म गर्व्हॅनमेंट डिपॉझिट (एलटीजीडी) श्रेणीनुसार 12 ते 15 वर्षासाठी सोने फिक्स्ड करता येते.

व्याज कसे मिळेल? : मुदत ठेवीची मॅच्यूरिटी पीरियड संपल्यानंतर ग्राहकांकडे व्याजासकट सोने घेण्याचे दोन पर्याय मिळतात. एक तर सोने परत घेणे किंवा सोन्याच्या तत्कालिन किमतीच्या बरोबरीने कॅश घेणे. अर्थात सोन्याच्या रुपाने एफडी परत घेतल्यानंतर 0.20 टक्के दराने अॅडमिनिस्ट्रेशन चार्ज वसूल केला जातो.

मुदतपूर्व काढल्यास काय होईल?: एसटीबीडी श्रेणीनुसार एक वर्षाचा लॉक इन पीरियड असतो. त्याचा कालावधी पूर्ण होण्याअगोदर पैसा काढल्यास व्याजदरावर पेनल्टी आकारली जाते. त्याचवेळी एमटीजीडी श्रेणीनुसार गुंतवणूकदार तीन वर्षानंतरही कधीही योजनेबाहेर पडू शकतो. अर्थात मॅच्यूरिटी पीरियडच्या अगोदर स्किम ब्रेक केल्यास व्याजदरावर पेनल्टी आकारली जाते. याशिवाय एलटीजीडी श्रेणीनुसार 5 वर्षानंतर सोने काढता येते. यातही व्याजदरावर पेनल्टी आकारली जाते.

एङ्गडी कोण करु शकते? : भारतीय इंडिव्हिज्यूअल्स, प्रोप्रारायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म, हिंदू अविभाजित कुटुंब (एचयूएफ), सेबीबरोबरच नोंदणीकृत म्युच्युअल फंड/ एक्स्चेंज ट्रेडेड फंड यासारख्या ट्रस्ट आणि कंपन्या देखील या योजनेनुसार गुंतवणूक करु शकतात.

सोने कोठे ठेवता येते ?: या योजनेनुसार सध्या स्टेट बँकेच्या निवडक शाखेतच सोने ठेवता येते. यात नवी दिल्ली, हैदराबाद, कोइमतूर, मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, लुधियाना, चेन्नई, विशाखापट्टण, थ्रिूशर येथील काही निवडक शाखांचा समावेश आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा