वेगाने वितळताहेत समुद्रातील हिमनग

‘ग्लोबल वॉर्मिंग’ चा सर्वाधिक परिणाम ग्लेशियर्सवर होत आहे. यासंदर्भात एक नवे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार जागतिक तापमान वाढीमुळे समुद्रात असलेले ग्लेशियर अंदाजापेक्षा जास्त वेगाने वितळत आहेत. समुद्रातील पाण्यात असलेल्या हिमखंडामध्ये होत असलेला बदल मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी एका वेगळ्या पद्धतीचा वापर केला. ‘सायन्स’ नामक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनातील माहितीनुसार नव्या पद्धतीच्या मदतीने ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीचा अचूक अंदाज लावता येणार आहे.

अमेरिकेतील ‘रटगर्स युनिव्हर्सिटी’ तील रेबेका जॅक्सन यांनी सांगितले की, जगात सर्वाधिक समुद्री ग्लेशियर हे ग्रीनलँड, अलास्का व अंटार्क्टिका भागात आढळतात. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पाण्यात असलेले हिमनगही आता वेगाने वितळू लागले आहेत. यामुळेही समुद्राची पातळी वेगाने वाढू लागली आहे. संशोधनाचे सहलेखक जॅक्सन यांनी पुढे सांगितले की, पाण्यात वितळत असलेल्या हिमनगांचा वेळीच शोध लावून प्रभावी पावले उचलल्यास त्यांचा वितळण्याचा वेग कमी करता येईल. ध्रुवीय प्रदेशातील बर्फाची चादरही ग्लोबल वॉर्मिंगमुळे वेगाने वितळू लागली आहे. यामुळे समुद्राची पातळी वाढून जगातील अनेक मोठी शहरे पाण्यात गडप होण्याची शक्यता वाढू लागली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा