कराचीवाला नगर परिसरात घंटागाडीची वेळ बदलावी; नागरिकांची मागणी

अहमदनगर – शहरातील सर्जेपूरा भागातील कराचीवाला नगर परिसरात नागरिकांच्या घरातील कचरा गोळा करण्यासाठी येणार्‍या घंटागाडीच्या वेळेत गेल्या दीड-दोन महिन्यांपासून अचानक बदल करण्यात आला असल्याने ही वेळ नागरिकांसाठी गैरसोयीची होत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने पुर्वीच्या वेळेतच या भागात घंटागाडी पाठवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कराचीवाला नगर परिसरात पूर्वी सकाळी 7-8 या वेळेत घंटागाडी येत असे मात्र आता ती वेळ बदलून सदर गाडी दुपारी 1 ते 1.30 दरम्यान येते. यावेळी घरात महिला एकट्याच असल्याने त्यांना घराबाहेर पडणे गैरसोयीचे होत आहे. सकाळच्या वेळेत घरात पुरुष मंडळी असल्याने कचरा घंटागाडीत नेऊन टाकणे सोयीचे होते. परंतू अचानक वेळ बदलल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पुन्हा पुर्वीप्रमाणेच सकाळच्या वेळेत घंटागाडी सुरु करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा