हिमोग्लोबिन म्हणजे काय?

हिमोग्लोबीन म्हणजे आपल्या शरीराचा प्राणच आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिमोग्लोबीन रक्तातील लाल पेशीत असते. हिमोग्लोबीन हे हिम व ग्लोबीन या दोन घटकांचे बनलेले असते. ग्लोबीन हे एक प्रथिन असून हिम या रंगद्रव्यात पार्फायरीन असते. पार्फायरीनमध्ये लोह असते व चार पायरॉल रचना असतात.

हिमोग्लोबीनच्या या विशिष्ट रचनेमुळे ते ऑक्सिजन वा कार्बनडायऑक्साईडशी संयोग पावते व अनुक्रमे ऑक्सी व कार्बोक्सी हिमोग्लोबीन तयार होतात. या त्याच्या गुणधर्मामुळेच शरीराला ऑक्सिजन पुरविणे व शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड फुप्फुसापर्यंत पोहोचविणे, हे कार्य ते करू शकते. हिमोग्लोबीन लाल असते व त्यामुळे रक्ताला लाल रंग असतो. फुप्फुसामध्ये कार्बोक्सी हिमोग्लोबीनमधून कर्बवायू सोडला जातो व ऑक्सिजनशी हिमोग्लोबीनचा संयोग होऊन ऑक्सिहिमोग्लोबीन तयार होते. त्याद्वारे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी प्रथिने, जीवनसत्वे लोह यांची आवश्यकता असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होण्यास रक्तक्षय असे म्हणतात. प्रौढ माणसाच्या रक्तात दर मिलीला 13 ते 15 ग्रॅम इतके हिमोग्लोबीन असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यासाठी समतोल आहार, हिरव्या पालेभाज्या यांचे खूप महत्त्व आहे. गरज पडल्यास लोहाच्या गोळ्या देऊन वा औषध देऊन वा क्वचित प्रसंगी व्यक्तीस रक्त देऊन हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविता येते. माणूस गुदमरल्यास वा श्‍वसनात ऑक्सिजन न मिळाल्यास रक्तातीत कार्बोक्सी हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. माणूस निळसर दिसतो. त्याला श्‍वास घेता येत नाही. दम लागतो व मृत्यूही ओढवतो. असे हे हिमोग्लोबीन.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा