जिल्ह्यातील गटई कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

चर्मकार विकास संघाचा लॉकडाऊनमध्ये आधार

अहमदनगर – जिल्ह्यातील गटई कामगारांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊनमध्ये आधार देण्याचे कार्य सुरु आहे. हातावर पोट असलेल्या गटई कामगार बांधवांना जीवनावश्यक किराणा साहित्य, मास्कचे घरपोच वाटप करण्याचे कार्य सुरु आहे. नुकतेच चर्मकार विकास संघाच्यावतीने शहरासह कोपरगाव मध्ये या जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

गटई कामगार आर्थिक दुर्बल घटक असून, हातावर पोट असल्याने लॉक डाऊनमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या पुढाकाराने  गटई कामगारांना मदत देण्याचे कार्य सुरु आहे. या सामाजिक कार्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींचे हातभार लागता आहे.

नुकतेच कोपरगाव मध्ये ४० गटई कामगार कुटुंबीयांना किराणा किट व मास्कचे वाटप करण्यात आले. तर सर्व गटई कामगारांना देखील घरा बाहेर न पडता घरीच थांबण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी चर्मकार विकास संघ कोपरगाव विभागाचे माधवराव पोटे (मामा), रंगनाथ बारकू कानडे, कचरू लोहकरे, विशाल अशोक पोटे यांचे विशेष योगदान लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा