चर्चा ‘उभ्या बागां’ ची

सध्या अनेक शहरांमधील हवेचे प्रदूषण चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यासाठी शहरांमधील अपुर्‍या जागांमधूनही कसे तरी झाडे लावण्याची कसरत अनेक ठिकाणी केली जात आहे. मेक्सिकोमध्येही शहरांना प्रदूषणरहीत बनवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहे.

मेक्सिको सिटीत ‘वाया वर्दे’ नावाच्या एका मोहिमेत उड्डाण पुलांच्या खांबांवर ‘व्हर्टिकल गार्डन’ विकसित करण्यात आल्या आहेत. या ‘उभ्या बागां’ मुळे शहरात अधिकाधिक ऑक्सिजन निर्माण होईल आणि हवा ताजी राहील. अशा एक हजार खांबांवर बागा बनवण्यात आल्या आहेत. मेक्सिको सिटीला ‘ग्रे’ (धूसर’ पासून ‘ग्रीन’ बनवण्याची ही मोहिम आहे. गेल्या काही वर्षांपासून मेक्सिको सिटीत रहदारीमुळे कार्बन डायऑक्साईडसारख्या वायूंनी तसेच स्मॉगने हवा प्रदूषित केली आहे.

तेथील एक एनजीओ ‘लीगा पेटोनल’ च्या सर्जियो ओचोआ यांनी सांगितले की शहरात मोटारींची संख्या भरमसाठ वाढली आणि त्याचबरोबरच प्रदूषणही वाढले. शहरात वृक्षारोपण करण्याची आमची इच्छा होती; पण त्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. अशावेळी ‘वाया वर्दे’ मोहिमेची संकल्पना आर्किटेक्ट फर्नांडो ओर्टिज मोनासतेरियो यांनी दिली. त्यांची फर्म ‘वर्दे व्हर्टिकल’ ने लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ऑनलाईन चेंडॉटऑर्ग पिटिशनही चालवली. ही मोहीम यशस्वी झाली तर मेक्सिको सिटीतील एकूण लोकसंख्येव्यतिरिक्त अन्य 25 हजार लोकांसाठीही ऑक्सिजन निर्माण होईल. लोकांनी पाठिंबा दिला आणि मोठा निधी उभा राहिला. त्यामधून एक हजार खांबांवर व्हर्टिकल गार्डन बनवण्याचे काम सुरू झाले. आता त्याचे सुखद परिणामही दिसून येत आहेत. चीनमधील बीजिंग किंवा भारताची राजधानी नवी दिल्लीही प्रदूषणाच्या विळख्यात आहे. तिथेही असे काही उपाय लाभदायक ठरू शकतील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा