नगरकरांसाठी स्वरबहार इव्हेंटस्तर्फे 5 मे रोजी विनामूल्य खुला म्युझिकल तंबोला कार्यक्रम

अहमदनगर- येथील स्वरबहार इव्हेंटस् च्या वतीने नगर शहरामध्ये रविवार, दि. 5 मे 2019 रोजी म्युझिकल तंबोला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुलमोहोर रोडवरील कोहिनूर मंगल कार्यालयात सायंकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत होणार आहे. सर्वांसाठी खुल्या म्युझिकल तंबोला कार्यक्रमाचे आयोजन नगर शहरात प्रथमच होत आहे, अशी माहिती ‘स्वरबहार’चे संचालक राजेंद्र टाक यांनी दिली.

ज्युनिअर व सिनिअर सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता झाल्या असून, निवडणुकांची धामधूम संपली आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकांना अधिकाधिक आनंद देण्याच्या उद्देशाने अक्षय्यतृतीयेचे औचित्य साधत हा कार्यक्रम नगरकरांसाठी विनामूल्य आयोजित केला असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमात रसिकांना गेल्या चार दशकांतील सदाबहार हिंदी गीते ऐकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय म्युझिकल तंबोला या कार्यक्रमाद्वारे नगरकरांना 10 हजार रुपयांची रोख बक्षिसे जिंकता येणार आहेत. राजेंद्र टाक हे फिल्मी दुनियेतील रंगतदार किस्से सांगत विविध गायकांनी गायलेल्या गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत. लाइव्ह ऑर्केस्ट्राची जोड कार्यक्रमाला लाभणार आहे.

विविध मंडळे व संस्थांसाठी स्वरबहार वाद्यवृंदाच्या माध्यमातून म्युझिकल तंबोला सादर केला जातो. त्याला रसिकांची नेहमीच चांगली दाद मिळाली आहे. रसिकांची चित्रपट गीते व बॉलिवूड संदर्भातील आवड विचारात घेता हा एक वेगळ्या धाटणीचा संगीतमय कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, हा देखील कार्यक्रम आयोजनमागील हेतू असल्याचे श्री. टाक यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचा आनंद अधिकाधिक नगरकरांना घेता यावा, यासाठीच खुल्या म्युझिकल तंबोला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मनोरंजनात्मक असून, सर्व कुटुंबाने एकत्र बसून पहावा, खेळावा असा आहे. 550 जणांना या कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जाणार असल्याने प्रथम येणार्‍यास प्राधान्य दिले जाईल. एका व्यक्तीस एकच कूपन दिले जाईल. कार्यक्रमात नगरकरांनी सहभागी होऊन आनंद घ्यावा. अधिक माहितीसाठी 9422220875 व 9595215100 वर संपर्क साधावा, असे आवाहन ओंकार टाक यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा