मोफत धान्य वितरणासाठी ग्राहक पंचायतला सहभागी करून घ्या

अकोले – सध्याच्या लॉकडाऊन च्या परिस्थितीत शासकीय मनुष्यबळ अपूर्ण पडत असून सरकारच्या मोफत धान्य वितरण योजनेचा लाभ प्रत्येक गरजू व गरीब परिवारास व्हावा यासाठी ग्राहक पंचायतच्या सदस्यांना ओळखपत्रे देऊन या योजनेच्या 100% अंमलबजावणी साठी सहभागी करून घ्यावे, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नगर जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी केली आहे.

ग्राहक पंचायत ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारच्या नीती आयोगाच्या पत्रात ग्राहक पंचायत सदस्यांना सेवाभावी कार्यात समाविष्ट करून घ्यावे असे सुचविण्यात आलेले आहे. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी नीती आयोगाच्या पत्राचा संदर्भ देऊन प्रत्येक जिल्हा व तालुका शाखांना शासनाच्या या कार्यात स्वयंस्फूर्तीने व सेवाभावी वृत्तीने सहभागी होण्यास सुचविले आहे. व या सर्व संदर्भासह तहसीलदार मुकेश कांबळे यांचेकडे नुकताच पत्रव्यवहार दाखल करण्यात आला.

सध्या कोरोनाची साथ संपूर्ण जगात सुरू असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या साथीला रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे.असा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू नागरिकांना वेळेत मिळणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणून ही संधी ग्राहक पंचायत ला मिळावी अशी मंडलिक व त्यांच्या सहकाऱ्यांची मागणी आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री, अन्न व ग्राहक संरक्षण चे केंद्रीय व राज्य मंत्री यांनी जाहीर केलेल्या मोफत धान्य वितरण कार्यक्रमात जिल्हा व तालुका स्तरावर आपल्या अधिपत्याखालील समितीत अशासकीय सदस्य म्हणून ग्राहक पंचायत शाखा अकोलेच्या सदस्यांना संधी मिळावी.

शासनाच्या या कार्यात आम्ही विमामुल्य सेवा देण्यास तयार असल्याचे मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेणकर, दत्ता रत्नपारखी, रमेश राक्षे, ऍड. दीपक शेटे, महेश नवले, माधव तिटमे, भाऊसाहेब वाळुंज, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, दत्ता ताजने, किरण चौधरी, प्रकाश कोरडे, सुरेश पवार, राम भांगरे, शब्बीर शेख, कैलास तळेकर, ज्ञानेश्वर पुंडे, सुदाम मंडलिक, राजेंद्र लहामगे आदींनी स्पष्ट केले असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा