चेक आल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक

अहमदनगर – तुमचा 5 लाखांचा चेक आला आहे. पण त्यासाठी तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल. रक्कम नसेल तर दागिने द्या, अशी बतावणी करून एका तासात चेक देतो, असे सांगत अज्ञात इसम दागिने घेऊन पसार झाला. ही घटना आलमगीर रोड, पाण्याच्या टाकीजवळ, विजयनगर, भिंगार येथे शनिवारी (दि.18) दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की, रत्नमाला अर्जुन अस्मर (वय 58, रा. विजयनगर, आलमगीर रोड, पाण्याच्या टाकीजवळ, भिंगार) या घरात एकट्या असताना गव्हाचे दळण करीत होत्या. त्यावेळी एक अज्ञात इसम मोटारसायकलवरून आला. त्याने तुम्हाला 5 लाखांचा चेक आलेला आहे, अशी बतावणी करून तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. त्यावेळी रत्नमाला यांनी माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. त्यावर तो इसम म्हणाला की तुमच्या गळ्यातील दागिने द्या मी एका तासात चेक आणुन देतो, असे सांगितले. त्यावर अस्मर यांनी त्यांच्या गळ्यातील 44 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्याचे विविध दागिने काढुन दिले. दागिने घेऊन तो इसम पसार झाला.

याप्रकरणी रत्नमाला अस्मर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, 406 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार पाठक हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा