श्रध्दास्थानांच्या कार्यात योगदान देताना मनस्वी आनंद – नरेंद्र फिरोदिया

फिरोदिया फौंडेशनतर्फे आगडगाव देवस्थानला मिनी बसची भेट

अहमदनगर- आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण भौतिक सुखाच्या पाठीमागे धावत आहे. यश मिळवण्यासाठी प्रचंड धावपळ केली जाते. परंतु, ही दगदग करतानाच प्रत्येकाला मानसिक शांतताही हवी असते. ती देण्याचे काम धार्मिक स्थळांमुळे होते. प्रत्येकाने आपली श्रध्दास्थाने कटाक्षाने जपली पाहिजे. याठिकाणीच नतमस्तक झाल्यावर प्रत्येकाला खर्‍याअर्थाने शांती, समाधान लाभते. आगडगाव येथील भैरवनाथ मंदिर असंख्य भाविकांसाठी आनंद देणारे तीर्थस्थळ आहे. येथील देवस्थानच्या उत्तम कार्यात योगदान देणे आपल्यासाठीही अधिक समाधानाची व मनस्वी आनंदाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरीयल फाउंडेशनच्यावतीने आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानला नुकतीच मिनी बस भेट देण्यात आली. फिरोदिया फाउंडेशनच्या अध्यक्षा आशाताई फिरोदिया, सचिव राखी फिरोदिया, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते गाडीची चावी देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे व विश्वस्त मंडळाकडे सूपूर्द करण्यात आली.

याप्रसंगी खजिनदार दिलीप गुगळे, हर्ष बोकडिया, गौरव भंडारी, अमित बुरा, निलेश भंडारी, दिलीप भंडारी, संदीप जोशी, देवस्थानचे उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड, सचिव त्र्यंबक साळुंके, विश्वस्त चंद्रकला खाडे, दिलीप गायकवाड, संभाजी कराळे, तुलशीदास बोरुडे, गोरक्षनाथ जाधव, नितीन कराळे, मुरलीधर कराळे, व्यवस्थापक नामदेव कराळे तसेच देवस्थानचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

देवस्थानचे अध्यक्ष बलभिम कराळे म्हणाले की, फिरोदिया परिवाराने यापूर्वीही फाउंडेशनच्यावतीने देवस्थानला रुग्णवाहिकेची भेट दिली आहे. आता नव्याने मिनी बस दिली असून याचा उपयोग भाविकांची नेआण करण्यासाठी होणार आहे.

देवस्थानचा नावलौकिक राज्यात वृध्दींगत झाला असून येणार्‍या प्रत्येक भाविकाला चांगल्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी फिरोदिया परिवाराने नेहमीच योगदान दिले आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेला हा परिवार खर्‍या अर्थाने समाज घडविण्याचे काम करीत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा