महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करा

अहमदनगर – संपूर्ण जगावर तसेच आपल्या देशावर ज्या कोरोना सारख्या महामारी विषाणू पासून हाहाकार झाला आहे, अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सरकारने जे निर्देश दिले आहेत त्याचे सर्वांनी पालन करा, जरुरी असेल तरच घरा बाहेर निघा, १ मीटर अंतर ठेवा, मास्क चा वापर करा, हात स्वच्छ धुवा, आत्यावश्यक सुविधा ह्या रोजच्या रोज व मुबलुक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. अन्न धान्याचा साठा पुष्कळ प्रमाणात आहे, तरी सर्वांनी राज्य व केंद्र सरकारने केलेले आव्हान तसेच लागू केलेले आदेश, निर्देश, लोकडाऊन याचे पालन करा, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र संघातर्फे संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.

आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोना पेक्षा घातक आहे. याचाही विचार करा व येणारी महात्मा जोतीराव फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आपल्या घरीच ह्या महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांनी लिहिलेले ग्रंथ, कांदबरी, त्यांचे लिखाण वाचून उदा. शेतकऱ्यांचे आसूड, ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, संसार, सत्यधर्म पुस्तिका, शिवाजी महाराजांच्या वरील पोवाडा, त्या प्रमाणे त्याचे अनुलोकन करून, समस्त मानव जातीला त्यांचे आचार विचार पटऊन त्या प्रमाणे वागून, जाती भेदाचे राजकारण बाजूला ठेऊन साजरी करा.

तसेच त्या प्रमाणे यासाठी होणारा खर्च, आपण करणारा खर्च, तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार सुद्धा ह्या दोन्ही महापुरुषांच्या जयंती साठी पुष्कळ प्रमाणात पैसा खर्च करतात तो पुढेही खर्च न करता संपूर्ण देशावर आलेल्या ह्या कोरोना सारख्या महामारी विषाणू पासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सोई सुविधा ह्या साठी खर्च करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा