व्यवसायिकांसाठी भागीदारी पार्टनरशिप व्यवसायातील पोषक वातावरण कार्यशाळा

अहमदनगर- फेअर ट्रिक्स या संस्थेमार्फत आयोजित केलेले पार्टनरशिप व्यवसायातील पोषक वातावरण याविषयीची कार्यशाळा होटेल आयरिस प्रेमियर बुरूडगाव रोड येथे 4 ऑगस्ट रोजी झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले दीप प्रज्वलन सीए सतीश दायमा, डॉ. रणजीत सत्रे, जयकुमार मुनोत, सीए राजेश शाह, डॉ. प्रसाद उबाळे, अॅड. स्वाती यादवाडकर यांनी केले. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रमध्ये डॉ. प्रसाद उबाळे (व्यवसायिक मानसशास्त्रज्ञ) यांनी पार्टनरशिपमधील पार्टनर्स कसे असावेत, त्यांच्यामध्ये इंटरपर्सनल रिलेशन्स कसे वाढवावेत त्याचबरोबर पार्टनरशिपमधील वातावरण सुदृढ कसे ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले.

द्वितीय सत्रमध्ये सीए राजेश शाह यांनी पार्टनरशिप व्यवसायामध्ये कोणत्या कोणत्या कारणांनी वाद होऊ शकतात आणि त्यावर काय उपाय करता येतात याविषयी मार्गदर्शन केले.

तृतीय सत्रामध्ये अॅड. स्वाती यादवाडकर यांनी पार्टनरशिप व्यवसायांमधील क्रिट्रीकल सिच्युएशनमधील कायदेशीर आणि व्यवहारिक उपाय याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये अहमदनगर, पुणे, नारायणगाव परिसरातील 48 व्यावसायिकांनी भाग घेतला. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी फेअर टॅक्सच्या ट्रिक्सच्या सर्व सभासदांनी आपले योगदान दिले. अशाप्रकारच्या व्यवसायिक कार्यशाळा अहमदनगरमध्ये पुढेही घेण्याचा मानस फेअर ट्रिक्सच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा