संगीत ययाती आणि देवयानी नाटकाचा माऊली सभागृह येथे 18 ऑगस्टला प्रयोग

अहमदनगर – वि.वा. शिरवाडकर लिखित संगीत ययाती आणि देवयानी या संगीत नाटकाचा प्रयोग खास नगरकरांसाठी गंधर्वभूषण जयराम शिलेदार ट्रस्ट, पुणेतर्फे माऊली सभागृह येथे 18 ऑगस्ट रोजी सायं. 5.30 वाजता सादर होणार आहे. सं.ययाती आणि देवयानी हे नाटक संगीत रंगभूमीवरील महत्वाचे नाटक आहे. कच देवयानीची कथा खाडिलकर यांच्या सं. विद्याहरण नाटकात झाली आहे. त्यापुढील कथा भाग या रंगविला आहे. आपापल्या स्वभावधर्माप्रमाणे वागत असलेल्या ययाती, देवयानी, शर्मिला, कचदेव यांच्यामधील वैचारिक संघर्ष या नाटकात प्रभावीपणे रंगवला आहे.

पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरसाजाने नटलेली यती मन मम, प्रेम वरदान, सर्वात्मका सर्वेश्वरा, हे सुरांनो, चंद्र व्हा अशी अनेक लोकप्रिय पदे या नाटकात आहेत. मराठी भाषेच सौंदर्य आणि अभिजात नाटयसंगीताची जादू या नाट्यप्रयोगात अनुभवायला मिळते.

गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाटयसेवा ट्रस्टतर्फे हे नाटक रंगभूमीवर आले असून दीप्ती भोगले यांनी दिग्दर्शन केले आहे. संगीत मार्गदर्शन ज्येष्ठ गायिका अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे आहे. निनाद जाधव, श्रद्धा सबनीस, सुदीप सबनीस, स्नेहल नेवासकर, चिन्मय जोगळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऑर्गनची साथसंगत लीलाधर चक्रदेव तसेच तबल्यावर विद्यानंद देशपांडे हे करणार आहेत.

देणगी प्रवेशिकांसाठी संपर्क-सागर मेहेत्रे – 9763119719.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा