उपवासाचा डोसा

साहित्य – बटाट्याची उपवासाची सुकी भाजी, अडीच वाट्या (तीन कप) वरईचे निवडलेले तांदूळ, जिरे अर्धा टि-स्पून, मीठ, तूप, मिरची.

कृती – वरई तांदूळ चार तास पाण्यात भिजत घाला. उपसून मिक्सरमधून बारीक करून घ्या. तसेच झाकून ठेवा. चार/पाच तासांनी त्यात जिरे, थोडी वाटून घेतलेली मिरची, मीठ घालून चांगले कालवून घ्या. आचेवर तवा ठेवा. त्यावर तूप पसरून घाला.

नेहमीप्रमाणे जसे डोसे करतात त्याप्रमाणे करा. भाजत आल्यावर त्यावर आधीच तयार करून ठेवलेली बटाट्याची सुकी भाजी घाला. डोसा गुंडाळून मोठ्या डिशवर काढा. गरम असतानाच खा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा